Nitin Gadkary - Ahmed Patel
Nitin Gadkary - Ahmed Patel

गडकरी - अहमद पटेलांमध्ये फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा?

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याचे उजवे हात समजले जाणारे अहमद पटेल यांच्यात आज सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत राजकीय मुद्दा नव्हता तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबाबतआमच्यात चर्चा झाल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याचे उजवे हात समजले जाणारे अहमद पटेल यांच्यात आज सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत राजकीय मुद्दा नव्हता तर महाराष्ट्रातल्या अतीवृष्टीमुळे शेतीवर आलेल्या संकटाबद्दल आमच्यात चर्चा झाल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटले आहे. भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटी घेतल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर पटेल -गडकरी यांच्यातल्या आजच्या चर्चेकडे राजकीय लक्ष लागले होते. मात्र, शेतीबाबत चर्चा झाल्याचे सांगत पटेल यांनी वेगळेच वळण दिले आहे. 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा प्रश्न असताना ही भेट राजकीय नाही, या म्हणण्यावर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत भाजप असल्याने आताही सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपसोबत असेल, हा पहिला पर्याय अर्थात 'प्लॅन ए' शिवसेनेसमोर आहे. मात्र तसे न घडल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्ता स्थापन करणार आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असा शिवसेनेचा 'प्लॅन बी' आहे. ते पाहता भाजप आणि काँग्रेस या दोन मातब्बर पक्षांचे मातब्बर नेते केवळ शेतीवर चर्चा करतात, हे आश्चर्यकारक असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com