bjp near clear majority in sangli | Sarkarnama

बहुमताचा आकडा गाठला, पण सांगलीत भाजप विजयोत्सवाची घाई करेना! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : येथील महापालिकेच्या मतमोजणीत भाजपने जोरदार मुसंडी मारुन बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र कलाचे रुपांतर प्रत्यक्ष विजयात होईपर्यंत थांबण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. 

सकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी 25 जागांवर पोचली असताना भाजपची संख्या 12 वर होती. मात्र भाजपने वातावरण बदलून दाखवले. शेवटच्या टप्प्यात भाजप 39 जागांवर पोचले आहे. 39 जागा हा बहुमताचा आकडा आहे. परंतु मोजणी अजून पुर्ण झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे प्रतीक्षा करत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख