BJP -NCP bagged 3 chairmanship posts in Solapur District | Sarkarnama

भाजप, राष्ट्रवादीचे तीन तालुक्‍यात सभापती

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 मार्च 2017

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी तीन तर स्थानिक आघाड्यांनी तीन तालुक्‍यात सत्ता संपादन केली. शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी एका तालुक्‍यात बाजी मारली आहे.

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी तीन तर स्थानिक आघाड्यांनी तीन तालुक्‍यात सत्ता संपादन केली. शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी एका तालुक्‍यात बाजी मारली आहे.

करमाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे शेखर गाडे तर उपसभापतिपदी गहिनीनाथ ननवरे, बार्शीच्या सभापती पदी राष्ट्रवादीच्या कविता वाघमारे तर उपसभापतिपदी भाजपचे अविनाश मांजरे, अक्कलकोटच्या सभापतिपदी काँग्रेसच्या सुरेखा काटगाव तर उपसभापतिपदी प्रकाश हिप्परगी, सांगोला पंचायत समितीच्या सभापतिपदी शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या माय्याक्का यमगर तर उपसभापती शोभा खटकाळे, पंढरपूर तालुक्‍याच्या सभापतिपदी भाजपचे दिनकर नाईकनवरे तर उपसभापतिपदी अरुण घोलप, माढा तालुक्‍याच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे विक्रमसिंह बबनराव शिंदे तर उपसभापतिपदी बाळासाहेब तुकाराम शिंदे, उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या सभापतिपदी भाजपच्या संध्याराणी पवार तर उपसभापतिपदी रजनी भडकुंबे, मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतिपदी जनहित विकास आघाडीचे प्रदीप खांडेकर तर उपसभापतिपदी विमल पाटील, माळशिरस तालुक्‍याच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या वैष्णवीदेवी मोहिते-पाटील तर उपसभापतिपदी किशोर सूळ तर दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या ताराबाई पाटील तर उपसभापतिपदी शिवसेनेचे संदीप टेळे यांची निवड करण्यात आली.
मोहोळमध्ये चिठ्ठीद्वारे निवड
मोहोळ तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भीमा-लोकशक्ती आघाडी यांना प्रत्येकी सहा जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. त्यात भीमा-लोकशक्ती आघाडीच्या समता गावडे यांची सभापती तर साधना देशमुख यांची उपसभापतिपदी निवड झाली. विशेष म्हणजे मोहोळ तालुक्‍यात सलग दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये चिठ्ठीद्वारे सभापती, उपसभापती निवड झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख