'या' साठी संसदेत भाजपचे लोक डावी-उजवीकडे बघून माझे अभिनंदन करत होते : शरद पवार 

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर सर्वप्रथम जेव्हा दिल्लीला संसदेत पोचलो. तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते डावी-उजवीकडे बघून, कोणी आपल्याकडे बघत तर नाही आहे ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवून अभिनंदन करत होते, असे गुपित शरद पवारांनी काल 'देवगिरी' बंगल्यावर उघड केले.
Bjp Mp's Congratulated Me for Bringing Down BJP Government Say Sharad Pawar
Bjp Mp's Congratulated Me for Bringing Down BJP Government Say Sharad Pawar

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर सर्वप्रथम जेव्हा दिल्लीला संसदेत पोचलो. तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते डावी-उजवीकडे बघून, कोणी आपल्याकडे बघत तर नाही आहे ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवून अभिनंदन करत होते, असे गुपित शरद पवारांनी काल 'देवगिरी' बंगल्यावर उघड केले. 

यावेळी त्यांनी डावी-उजवीकडे कडे बघून भाजप च्या नेत्यांची 'अॅक्शन' करून दाखवली तेव्हा मोठाच हशा पिकला. आज दिवसभरातील त्यांचे कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी चार वाजता त्यांनी पत्रकारांना अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी 'देवगिरी' वर बोलावले होते. फडणवीस सरकार घालाविल्याबद्दल आपले अभिनंदन, असेच कदाचित् तेव्हा भाजपच्या नेत्यांना म्हणायचे होते, असे मला ठामपणे वाटल्याचेही ते म्हणाले.

राज्य सरकार मधील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत विचारले असता, अधिवेशन संपल्यानंतर दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार कदाचित होईल, असे ते म्हणाले. विदर्भाच्या विषयावर विचारले असता, उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे विदर्भावर जर लक्ष केंद्रित केले असते तर येथूनही आमच्या जागा निश्चितपणे वाढल्या असता, असे त्यांनी सांगितले. 

यापुढे विदर्भासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. महा विकास आघाडी यापुढे एकजुटीने राहिल्यास या आघाडीला भविष्यातही अनेक वर्ष पर्याय उपलब्ध होणार नाही, असेही पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, आमदार अनिल देशमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com