जिल्हा परिषदेत मनपाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रावसाहेब दानवे लातूरमध्ये

बहुमत असले तरी राज्यात झालेले सत्तांत्तर तसेच लातूर जिल्ह्याला मिळालेल्या दोन मंत्रिपदांमुळे भाजपने सतर्कता बाळण्यास सुरवात केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीतकोणत्याही स्थितीत फाटाफूट होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.त्याची पहिली सुरवात म्हणून भाजपने सदस्यांसाठी व्हीपही काढला आहे
Raosaheb Danave In Latur For Zilla Parishad Election
Raosaheb Danave In Latur For Zilla Parishad Election

लातूर  : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उद्या होणाऱ्या निवडीत भाजपने ताक फुंकून पिण्यास सुरवात केली आहे. दोन सदस्यांनी बंड केल्यामुळे महानगरपालिकेतील भाजपची सत्ता गेली. 

जिल्हा परिषदेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपच्या प्रदेश शाखेने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सूत्रे स्वतःकडे घेतली आहेत. यातूनच केंद्रीय राज्यमंत्री व पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आज लातुर इथ आले आहेत.

त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.जिल्हा परिषदेच्या 58 सदस्यांत धीरज देशमुख आमदार झाल्यामुळे त्यांचे एकुरगा गटाचे एक पद रिक्त आहे. उर्वरित 57 सदस्यांत भाजपचे 35, कॉंग्रेसचे 14, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच, अपक्ष दोन व शिवसेनेचा एक असे संख्याबळ आहे. यातील दोन्ही अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. 

बहुमत असले तरी राज्यात झालेले सत्तांत्तर तसेच जिल्ह्याला मिळालेल्या दोन मंत्रिपदांमुळे भाजपने सतर्कता बाळण्यास सुरवात केली आहे. कोणत्याही स्थितीत फाटाफूट होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्याची पहिली सुरवात म्हणून भाजपने सदस्यांसाठी व्हीपही काढला आहे. महानगरपालिकेत भाजपला बहुमत असतानाही दोन सदस्यांनी बंडखोरी करत कॉंग्रेसला साथ दिली. या सदस्यांना पक्षातील कोणत्या नेत्याने पाठबळ दिले, हे आता लपून राहिलेले नाही. 

यामुळेच विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील भाजपची उरलीसुरली ताकद कमी होऊ लागली.जिल्ह्यात पक्षामध्ये अनेक गट आहेत. मात्र, सध्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार यांचा गट तेजीत आहे. महापालिकेप्रमाणे याचा फटका जिल्हा परिषदेत बसू नये म्हणून दानवे रविवारी येथे आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com