प्रितम मुंडेंनी बैलगाडीतून जाऊन केली नुकसानीची पाहणी

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करत प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा होईल, असा धीर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी दिला. वाकनाथपूर या गावाला जाण्यासाठी नदी आडवी असल्याने बैलगाडीतून प्रवास करत त्यांनी गाव गाठले.
BJP MP Preetam Munde in Bullock Cart
BJP MP Preetam Munde in Bullock Cart

बीड : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करत प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा होईल, असा धीर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी दिला. वाकनाथपूर या गावाला जाण्यासाठी नदी आडवी असल्याने बैलगाडीतून प्रवास करत त्यांनी गाव गाठले.

आमदार लक्ष्मण पवार, भाजप नेते राजेंद्र मस्के यांच्यासह  त्यांनी बीड तालुक्यातील पेंडगाव, माळापुरी, औरंगपूर, भाटसांगवी, वाकनाथपुर, उंब्रज, खालसा, नागपूर, इट, पिंपळनेर, ताडसोन्ना आदी गावांचा दौरा करुन परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन, कपशी, बाजरी पिकांची पाहणी केली. वडवणी व परळी तालुक्यातही त्यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com