bjp mp letter to chandrakantdada not ss minister | Sarkarnama

रस्त्याचा कारभार शिवसेनेकडे असताना खा. सहस्त्रबुद्धेंचे पत्र चंद्रकांतदादांना 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

ठाणे ः टोल लावण्यात आलेल्या रस्त्यांचा कारभार शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याच्याऐवजी टोलमाफीसाठी भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर पत्रव्यवहार केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

ठाणे ः टोल लावण्यात आलेल्या रस्त्यांचा कारभार शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याच्याऐवजी टोलमाफीसाठी भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर पत्रव्यवहार केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेना सत्तेत सहभागी आहे. पण त्याचवेळी या दोन्ही पक्षाचा कारभार आपल्यापरीने वेगळा ठेवण्याचा काटोकाट प्रयत्न केला जात असतो. शिवसेना कायम विरोधकाच्या भूमिकेत जाण्याचे चित्र रंगवित सत्तेचा सहभाग मात्र कायम ठेवत आहे. तर भाजपचे पदाधिकारी त्याचवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांबरोबर आपला कोणताही संबध जोडला जाऊ नये यासाठी काळजी घेताना दिसत आहे. 

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना भाजपमधील प्रमुख व्यूहरचनाकारपैकी एक मानले जाते. स्थानिक स्तरापासून दिल्लीच्या वर्तुळापर्यंत उठबस असलेले सहस्त्रबुद्धे मितभाषी असून प्रसिद्धीपासून चार हात दूर राहिले आहेत. पण त्याचवेळी भाजपमधील सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या एका वरिष्ठ नेत्याने टोलमाफीचा विषय शिवसेनेच्या मंत्र्याबरोबर संबधित असल्याने त्या विषयावर संबधित मंत्र्यांबरोबर संवाद साधणे गरजेचे असताना भाजपच्या मंत्र्यांबरोबरच संपर्क साधून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 

सध्या ठाण्यातील नागरिकांना मुंब्रा बायपास दुरुस्तीच्या कामामूळे बंद असल्याने तसेच रस्त्यावरील खडडयांमूळे ठाणेकरांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. ठाणेकर नागरिकांची बे सुमार जड वाहतुकी मुळे चहुबाजुंनी झालेली कोंडी आणि वाहतुकीस नित्त्य होणारा विलंब या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनापासून 

किमान गणेशोत्सवा पर्यंत मुलुंड आणि ऐरोली या टोल नाक्‍यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी मर्यादित टोल स्वातंत्र्य द्यावे अशी कळकळीची विनंती ठाण्याचे राज्यसभा खासदार डा. विनय सहस्रबुद्धे यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख