कपिल पाटील यांचे वाडा तालुक्‍यात ठाण; भाजपचा गड राखण्याचे आव्हान

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची वाड्याची जबाबदारी पक्षाने खासदार कपिल पाटील यांच्यावर सोपवली असून यासाठी ते अनेक दिवसांपासून वाड्यात ठाण मांडून बसले आहेत
BJP MP Kapil Patil Camping in Wada Tehsil
BJP MP Kapil Patil Camping in Wada Tehsil

वाडा : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी वाड्यात ठाण मांडले आहे. निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू असून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची वाड्याची जबाबदारी पक्षाने खासदार पाटील यांच्यावर सोपवली असून यासाठी ते अनेक दिवसांपासून वाड्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी कुडूस गट व त्याअंतर्गत येणारे चिंचघर व कुडूस या गणांचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पालसई गटात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकदिलाने काम करून गट, गण कायम राखण्याचे आवाहन केले.

पालसई गटाचे उमेदवार मंगेश पाटील, केळठण गणाच्या उमेदवार कृपाली पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. मांडा गटातही जाऊन त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते योगेश पाटील, कुंदन पाटील, मनीष देहेरकर, कृष्णा भोईर, केशव पाटील, राजेश चातुर्य आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com