भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांचा साखरपुडा - bjp mp heena gavit engagement ceremony | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांचा साखरपुडा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

...

नंदुरबार : नंदुरबारच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहबद्ध होत असून त्यांचा साखरपुडा आज (ता.26) येथे झाला.

डॉ. वळवी हे वैद्यकीय पदव्युत्तर असून ते मूळचे हातधुई (ता. धडगाव जि. नंदुरबार) येथील आहेत. ते `एमएस` असून मुंबईत ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.

हिना गावित यांचे शिक्षण एमबीबीएस, एमडी झाले आहे.  माजी मंत्री व व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हिना या कन्या आहेत.  डॉ. हिना यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असताना प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्य केले. मार्च 2014 मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला व प्रथमच नंदुरबार लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांनी कॉंग्रेसचे सलग नऊ वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा दणदणीत 1लाख 6905 मतांनी पराभव करीत त्या "जाएंट किलर'ठरल्या. तसेच त्या सर्वात तरुण आणि उच्च शिक्षित खासदार ठरल्या.

संबंधित लेख