पोलिस मारहाण करत आहेत; मजुरांचा फोन आला आणि धसांनी मध्यरात्रीच पोचून मांडला ठिय्या

मध्यरात्री सव्वा एक वाजता सुरेश धस यांना मजुरांचा फोन आला. ऊसतोड मजूरांना भिगवण - खेड (ता. कर्जत) येथे पोलिसांनी पकडून मारहाण करत असल्याची व्यथा सांगीतली आणि धस ताडकन निघाले आणि त्यांनी रात्रीपासून आज दुपारपर्यंत तिथेच ठिय्या मांडला
BJP MLA Suresh Dhas Went for the help of Sugarcane Workers
BJP MLA Suresh Dhas Went for the help of Sugarcane Workers

बीड : कोरोनाचे संकट आहे, सर्वत्र लॉकडाऊनमुळे विविध घटक विविध समस्यांना तोंड देत आहेत. परंतु, लोकप्रतिनिधी म्हणून कोणी व्यथा मांडल्यानंतर किती तडफेने धाऊन जायचे असते याचे उदाहरण आमदार सुरेश धस यांनी दाखविले आहे.

जिल्ह्यातील काही ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात येत हेाते. मध्यरात्री त्यांना भिगवण - खेड (ता. कर्जत) येथे पोलिसांनी अडविले. पोलिसांकडून धामधुम - मारहाण केली जात असल्याचा फोन सुरेश धस यांना मध्यरात्री सव्वा एक वाजता मजूरांना फोन आणि धसांनी गाडी काढून थेट घटनास्थळ गाठले आणि मजुरांसोबत ठिय्या मांडला तो थेट दुपारपर्यंत. पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

जिल्ह्यातील आष्टीसह पाटोदा, गेवराई आदी विविध भागातील मजूर ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेले आहेत. कारखान्यांचा हंगाम संपल्याने मजूर परतत आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व सिमा सिल केलेल्या आहेत. यामुळे या मजूरांना भिगवण - खेड (ता.कर्जत) येथे पोलिसांनी मारहाण केल्याची कैफीयत मजूरांनी रात्री सव्वा एक वाजता फोनवरुन सुरेश धसांच्या कानी घातली. 

धसांनीही थेट मध्यरात्रीच घटनास्थळ गाठले आणि पोलिसांवरील कारवाईच्या मागणीसाठी मजुरांसोबत ठिय्या मांडला. गुरुवारी दुपारपर्यंत ते मजुरांसोबतच बसून होते. ऊसतोड कामगारांना मारहाण कुठल्या नियमात बसते? असा सवाल करीत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com