आधीच्या आमदारांनी जातीपातीचे राजकारण केले : संतोष दानवे - BJP MLA Santosh Danve on his work | Politics Marathi News - Sarkarnama

आधीच्या आमदारांनी जातीपातीचे राजकारण केले : संतोष दानवे

तुषार पाटील
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

भोकरदन :  आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन आमदारांनी जो विकास केला त्याच्या दहापट विकास मागील पाच वर्षाच्या काळात मी केला, सत्ताधारी आमदार काय करू शकतो हे मी दाखवून दिले अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार आमदार संतोष दानवे यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

भोकरदन :  आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन आमदारांनी जो विकास केला त्याच्या दहापट विकास मागील पाच वर्षाच्या काळात मी केला, सत्ताधारी आमदार काय करू शकतो हे मी दाखवून दिले अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार आमदार संतोष दानवे यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या प्रचारार्थ वालसावंगी येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हवाला देत विरोधकांवर निशाणा साधला. संतोष दानवे म्हणाले, तत्कालीन आमदार चंद्रकांत दानवे यांनी जातीपातीचे राजकारण करून समाज निहाय सभागृह दिले, रस्त्याची कामे केली, ती देखील अर्धवट. मी मात्र 2014 ला दिलेल्या संधीचे सोने करीत मतदारसंघात दळणवळण, सिंचन आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली.

मतदार संघातील मुख्य बाजारपेठांना पहिल्यांदाच चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले व बाजारपेठांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व लोणार सरोवर यांना जोडणारा दुपदरी सिमेंटचा रस्ता मंजूर केला असून त्याचे काम सुरू झाले आहे.त्यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

मागील पाच वर्षाच्या काळात मी केलेला विकास व आघाडी सरकारच्या दहा वर्षाच्या काळातील अर्धवट राहिलेली कामे याची तुलना केल्यास निश्‍चितच तुम्ही मला मतदान करणार असा विश्वास मला असल्याचे संतोष दानवे यांची यावेळी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख