अफवांवर विश्वास ठेवू नका ,मी पुन्हा हिंगण्यातूनच लढेन :  समीर मेघे

5 वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता या मतदारसंघात होती. कोणतीही विकास कामे झाली नाहीत. -समीर मेघे
Sameer-Meghe
Sameer-Meghe

हिंगणा : विधानसभा क्षेत्रात विकासकामाची गाडी सुसाट चालवून जनतेशी नाळ जोडली. आता निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी वर्धा किंवा पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार अशा अफवा पसरविणे सुरू केले आहे. हिंगणा विधानसभा कर्मभूमी असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल येथूनच फुंकणार असल्याची घोषणा आमदार समीर मेघे यांनी केली.

स्थानिक शिवाजी चौकात नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आयोजित बांधकाम शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष छाया भोस्कर होत्या.  

आमदार समीर मेघे  पुढे म्हणाले,"नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया भोस्कर यांची वर्णी लागताच विकासकामाची घोडदौड सुरू झाली. हिंगणा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 7 कोटीचा निधी मंजूर केला.आत्तापर्यंत हिंगण्याच्या विकासासाठी 21 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी उपलब्ध करून दिला. वेणा नदीच्या विकासासाठी 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. 15 वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता या मतदारसंघात होती. कोणतीही विकास कामे झाली नाहीत."

प्रमुख पाहुणे म्हणून असंघटीत राज्य कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, उपाध्यक्ष हेमलता देशमुख, नगरसेवक डॉ.अजय पारधी, गटनेते अजय बुधे, नगरसेवक नरेंद्र बेहरे, फुलचंद सेवाकर, छाया कोल्हे, मुख्याधिकारी डॉ. ऋचा धाबर्डे, माजी सरपंच सतीश शहाकार, ज्ञानेश्वर भोस्कर, गुणवंत मते, उमेश आंबटकर, मधुकर झलके, संदीप झलके उपस्थित होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com