BJP MLA Rahul Aher Hands over resignation letter to Maratha Morcha Leaders | Sarkarnama

भाजपचे डाॅ. राहुल आहेर यांचा आमदारकीचा राजिनामा? आंदोलकांकडे केले राजिनामा पत्र सुपूर्द

संपत देवगिरे 
गुरुवार, 26 जुलै 2018

मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. मात्र, त्यासाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. त्यासाठी या आंदोलकांची भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. राहूल आहेर यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी काही आंदोलकांनी मागणी केल्यावर डॉ. आहेर यांनी समाजाची मागणी असेल व हित असेल तर आपलीही राजीनामा देण्याची तयारी आहे असे सांगीतले. ​

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही अत्यंत रास्त व हक्काची मागमी आहे. ती पूर्ण झालीच पाहिजे. त्यावर सरकार त्यांच्या स्तरावर लवकरच योग्य तोडगा काढील असा विश्‍वास आहे. मात्र यासाठी समाजाचे हित व मागणी असेल तर आमदारकीचा राजीनामाच काय जीवही द्यायची तयारी आहे.' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले आहे. डाॅ. आहेर यांनी आपले राजिनामापत्र सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.   

मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. मात्र, त्यासाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. त्यासाठी या आंदोलकांची भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. राहूल आहेर यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी काही आंदोलकांनी मागणी केल्यावर डॉ. आहेर यांनी समाजाची मागणी असेल व हित असेल तर आपलीही राजीनामा देण्याची तयारी आहे असे सांगीतले. त्यामुळे राजकीय हालचाली गतीमान झाल्या असुन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. 

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे याचे आंदोलन जोमात आहे. त्यात बुधवारी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव (कन्नड) आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी काल आरक्षणाला पाठींबा म्हणुन विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर या मागणीसाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले होते. त्याबाबत मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. मात्र त्यात भारतीय जनता पक्षाचे चांदवड- देवळा मतदारसंघाचे आणदार डॉ. राहूल आहेर यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा हा पहिलाच राजीनामा ठरण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख