हा तमाशा कधी थांबणार?: नितेश राणे

आज आरोग्यसेवेत काम करणाऱ्या नर्सेसना संरक्षक किट दिलेले नाहीत. पुरेशी व्हेंटिलेटर नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही निविदा काढत बसणार आहात की लोकांचं आयुष्य वाचवणार आहात"?
nitesh rane
nitesh rane

पुणे : " राज्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असताना राज्य सरकार मात्र अजून व्हेंटिलेटरसाठी निविदाच काढत आहे. ही वेळ निविदा काढण्याची नाहीतर तातडीने कृती करण्याची गरज आहे. लोकांना वाचवायचे असेल तर कोरोना संबधित साधनसामुग्री खरेदी करण्याची गरज आहे. निविदा काढून ती व्हेंटिलेटर येईपर्यंत हिकडं रुग्णांचे काय होईल?" असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

"आज आरोग्यसेवेत काम करणाऱ्या नर्सेसना संरक्षक किट दिलेले नाहीत. पुरेशी व्हेंटिलेटर नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही निविदा काढत बसणार आहात की लोकांचं आयुष्य वाचवणार आहात"? असे त्यांनी सरकारला विचारले आहे.

राणे यांनी ट्विट करून आपले मत मांडले आहे. "हा तमाशा कधी थांबणार ? असा प्रश्न विचारत राणे यांनी, कोरोनावरील उपचारासाठीची साधनसामुग्री खरेदी लांबणीवर पडली आहे. १००० वेंटिलेटर खरेदीची निवीदा रद्द झाली आहे. २० मार्चला काढली सरकारने निविदा काढली होती. एकाच कंपनीने एक हजार व्हेंटीलेटर पुरवण्याची तयारी दाखवली होती मात्र ही निविदा रद्द झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं निवीदा काढावी लागणार आहे." असे आमदार राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.  "पीपीटी किट आणि व्हेंटिलेटर या महत्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याच गोष्टी निविदा काढून मिळणार असतील तर महिना लागेल. मग महिन्यानी व्हेंटिलेटर येऊन त्याच काय करायचं ?आज लोकांना ज्याची गरज आहे ते मिळणार नसेल तर ते सरकारचे अपयश आहे. सरकारकडे कसलेही नियोजन नाही," असे आमदार राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com