भाजपचे मंगलप्रभात लोढा 500 कोटींचे मालक, 15 कोटींची सोने चांदी

Mangalprabhat-Lodha is very rich
Mangalprabhat-Lodha is very rich

मुंबई  : मुंबईमधील प्रसिद्ध बिल्डर व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीमध्ये गेल्या दहा वर्षात मोठी वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडणूक लढवताना लोढा यांनी आपली संपत्ती 68 कोटींची दाखवली होती. 

त्यात अनेक पटीने वाढ झाली असून यावेळी अर्ज भरताना लोढा यांनी आपली संपत्ती जवळपास 500 कोटींची दाखवली आहे. त्यात 15 कोटी रुपयांची सोने चांदी असून 14 लाख रुपये किमतीची एकच गाडी असल्याचे म्हटले आहे. 

मुंबईच्या मलबार हिल मतदार संघामधून आमदार म्हणून मंगलप्रभात लोढा निवडणून आले आहेत. 10 वर्षांपूर्वी 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्थावर 34 आणि जंगम 34 अशी 68 कोटींची मालमत्ता आणि 7 कोटींचे कर्ज असल्याचे लोढा यांनी जाहीर केले होते. 

2014 च्या निवडणुकीत लोढा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 200 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले होते. गेल्या पाच वर्षांत लोढांच्या मालमत्तेमध्ये 300 कोटींची भर पडली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी काल मलबार हिल मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे. 

 राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या नावावर 131 कोटी 66 लाखांची, पत्नीच्या नावावर 110 कोटी 71 लाख तर एकत्र कुटुंबाच्या नावावर 10 कोटी 22 लाख अशी 252 कोटी 59 लाख रुपयांची जंगम तर 229 कोटी 37 लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जवळपास 500 कोटींचे मालक असलेल्या लोढा यांनी आपलीकडे एकच 14 लाखांची जॅग्वार गाडी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.  

लोढा यांच्याकडे 4किलो 17 ग्राम सोने, 79 किलो 554 ग्राम चांदी आहे, त्याची किंमत 6 कोटी 55 लाख 89 हजार 812 रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे 7किलो 253 ग्राम सोने, 65किलो 554 ग्राम चांदी असून त्याची किंमत 7 कोटी 22 लाख 3 हजार 130 रुपये इतकी आहे. तर दोघांच्या नावाने एकत्र 29931 ग्राम चांदी असून त्याची किंमत 1 कोटी 28 लाख 96 हजार 674 रुपये इतकी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com