bjp mla lodha reachest in reality sector | Sarkarnama

भाजप आमदार मंगलप्रसाद लोढा २७ हजार कोटींचे मालक! ठरले देशातील सर्वांत श्रीमंत बिल्डर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

पुणे : भाजपचे मुंबईतील आमदार आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रसाद लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर ठरले आहेत. त्यांच्याकडील संपत्ती ही तब्बल 27 हजार 150 कोटींवर पोचल्याचे 2018 च्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 50 टक्‍क्‍यांनी लोढा यांची संपत्ती वाढली आहे. 2017 च्या याच अहवालानुसार लोढा यांची संपत्ती 18 हजार 610 कोटी रूपये होती. 

GROHE Hurun च्या 2018 च्या अहवालात मी माहिती देण्यात आली आहे. अर्थविषयक इंग्रजी वर्तमानपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षी या मालिकेत पहिल्या स्थानावर असलेले डीएलएफचे के. पी. सिंग हे यंदा पहिल्या दहात देखील स्थान मिळवू शकले नाही. गेल्या वर्षी सिंग यांची संपत्ती 23 हजार 460 कोटी रूपये होती. 

लोढा हे मलबार हिल या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1995 पासून ते विधानसभेत आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहत आहेत. लोढा डेव्हलपर्स या नावाने त्यांचे अनेक निवासी आणि व्यापारी बांधकाम प्रकल्प आहेत. 

लोढा यांच्या खालोखाल एम्बसी ग्रुपचे जितेंद्र वीरवानी हे दुसऱ्या क्रमांकाचे बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. त्यांची संपत्ती 23 हजार 160 कोटी रूपये आहे. डिएलएफचे राजीव सिंग हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याजे 17 हजार 690 कोटी रूपयांची संपत्ती आहे. मुंबईतील हिरनंदानी बिल्डर्सचे निरंजन हिरनंदानी आणि त्यांचे बंधू सुरेंद्र हे 5900 कोटीच्या संपत्तीवर सहाव्या क्रमांकावर आहेत. 

देशातील 100 श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांची एकूण श्रीमंती ही दोन लाख 36 हजार 610 कोटी आहे. त्यातील 35 नावे ही मुंबईतील आहेत. त्याखालोखाल दिल्लीतील 22 आणि बेंगळूरू येथील 21 नावे आहेत. 30 सप्टेंबर 2018 या दिवशीच्या मूल्यानुसार संपत्तीची आकडेमोड करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख