BJP Minister came late for Executive council meet | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

झोपाळू मंत्र्यांची कार्यकारणीलाही उशिरा हजेरी

गोविंद तुपे
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - आपल्या झोपाळू वृत्तीमुळे प्रसिध्द असलेले आदिवासी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आपल्या राजेशाहीतून बाहेर येताना दिसत नाहीत. पिंपरी चिंचवड याठिकाणी सुरू असलेल्या पक्षाच्या कार्यकारीणीला तर चक्क ते दुपार नंतर पोहचले. साहजिकच कार्यक्रमाच्या ठिकाणच्या सर्व खुर्च्या भरल्यामुळे अखेर त्यांना कार्यकर्त्यांच्या मागील शेवटच्या रांगेतील खुर्चीमध्ये बसावे लागले.

पुण्यातील चिंचवड भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक सुरू आहे. सर्व महत्वाचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला वेळेत पोहचले होते. कार्यक्रम सुरू झाला होता. मात्र, अचानक सर्वात पाठीमागील रांगेत बसलेल्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी उठविले. त्यामुळे मागील बाजूला असलेल्या सर्वच कार्यकर्ते हा काय प्रकार सुरू आहे अशा भावनेतून पहात होते. त्यावेळी पोलिसांनीच हलक्‍या आवाजात खुलासा करत मंत्री महोदयांना जागा देण्याची विनंती केली.

अशा प्रकारानंतर राजे आंब्रिशराव अत्राम यांना अखेर शेवटच्या कार्यकर्त्यांच्या रांगेत राहून कार्यक्रम पहावा लागला. मंत्रालयापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांना नेहमी उशीरा पोहचणाऱ्या राजेंनी कार्यकारणीला उशीरा पोहचून पुन्हा एकदा शिक्का मोर्तब केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख