जळगाव जिल्हा परिषद सभापतीपदासाठी भाजप सदस्याचा रस्त्यावरच गोंधळ

जळगाव जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांने रस्त्यावरच गोंधळ केला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची निवड झाली आहे.
Bjp Member Created Muddle on Road For Presidents Post in Jalgaon
Bjp Member Created Muddle on Road For Presidents Post in Jalgaon

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांने रस्त्यावरच गोंधळ केला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची निवड झाली आहे.

आज सभापतीपदासाठी निवड होती. सद्यस्थितीत भापजपचे बहुमत असल्यामुळे चारही सभापती भाजपचे होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना भाजपच्या सदस्यांनी सभापतीपदासाठी नावे जाहिर केल्यानतंर मात्र पक्षातील नाराजी उफाळून आली. पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य नाराज झाले. आपली सभापतीपदी निवड करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर रस्त्यावरच गोंधळ केला. 

त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु रस्त्यावर गोंधळ करीतच ते आपल्या गाडीतून ते निघून गेले. सभापतीपदाच्या निवडीसाठी भाजपचे नेते एकनाथराव खडसे व माजी मंत्री गिरीश महाजन यांची जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात स्वतंत्र चर्चा झाली.दोघांच्या बैठकित चार सभापतीपदासाठी नावे निश्‍चित करण्यात आली. मात्र रविंद्र पाटील यांना डावलून अमित देशमुख यांना सभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रविंद्र पाटील नाराज झाले. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपच्या नेत्याकडून विनवणी करण्यात येत होती. त्यावेळी जिल्हा परिषद कार्यालयासमोरच त्यांनी संतापात गोधंळ घातला व गाडीत बसून ते निघून गेले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com