भांबळेंचा पराभव करून भाजपच्या मेघना पोहचल्या विधानसभेत

2Meghna_20Bordikar.
2Meghna_20Bordikar.

परभणी :  जिंतूर - सेलू विधानसभा मतदार संघातील अतितटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे विद्यमान आमदार विजय भांबळे यांचा पराभव करत भाजपच्या मेघना साकोरे - बोर्डीकर या पहिल्यांदाच विधानसभेत पोहचल्या आहेत.

जिंतूर विधानसभा मतदार संघातून यावेळी अतितटीची लढत पहावयास मिळाली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे विद्यमान आमदार विजय भांबळे, भाजपच्या मेघना साकोरे - बोर्डीकर, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे, शिवसेनेचे बंडखोर राम पाटील यांच्यासह  13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 


सुरुवातीपासूनच मेघना बोर्डीकर व विजय भांबळे यांच्यात काट्याची लढत पहावायास मिळाली. खरी लढत ही मेघना साकोरे व विजय भांबळे यांच्यात पहावयास मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे यांना 13 हजार 37 मते
मिळाली. शिवसेनेचे बंडखोर राम पाटील यांना 5 हजाराचा टप्पा ही गाठता आला नाही.
 

मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 15 हजार 867 मते मिळाली.
तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजय भांबळे यांना 1 लाख 12 हजार 239 मते मिळाली. प्रत्येक फेरी निहाय दोन्ही उमेदवारामध्ये काट्याची टक्कर पहावयास मिळाली. 


शेवटच्या फेरी पर्यत दोघांचे मताधिक्य कमी अधिक होत असल्याने समर्थकांमध्ये धकधक वाढली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com