BJP May Try to Encroach on Shivsena's Constituencies | Sarkarnama

पक्षांतरामुळे भाजपचे सेनेच्या जागांवर अतिक्रमण शक्य

प्रशांत बारसिंग
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

लोकसभा निवडणुकीत भाजपाने केंद्रात एकहाती सत्ता आणल्याने राज्यातील युती सरकारही पुन्हा निवडून येण्याच्या शक्‍यतेमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रोसमधील बडे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. तसेच काही नेते शिवसेनेतही जात असले तर भाजपकडील ओढा मोठा आहे. या नेत्यांना विनाअट प्रवेश देत असल्याचे भाजप नेते सांगत असले तरी त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकिट देण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याचे हेच नेते सांगत आहेत. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा धडाका लावल्याने युतीच्या जागावाटपात कमालीची चुरस निर्माण होणार आहे. पक्षांतर करणारे सवर्ज्ञधिक नेते भाजपात जात असल्याने त्यांच्यासाठी शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघावर भाजपचे अतिक्रमण होण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने केंद्रात एकहाती सत्ता आणल्याने राज्यातील युती सरकारही पुन्हा निवडून येण्याच्या शक्‍यतेमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रोसमधील बडे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. तसेच काही नेते शिवसेनेतही जात असले तर भाजपकडील ओढा मोठा आहे. या नेत्यांना विनाअट प्रवेश देत असल्याचे भाजप नेते सांगत असले तरी त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकिट देण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याचे हेच नेते सांगत आहेत. 

तसेचे जे नेते भाजपात प्रवेश करत आहेत, त्यांचे मतदारसंघ यापूर्वी 2009 साली युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या ताब्यातील आहेत. यासाठी भाजपलाही काही जागांची अदलाबदल करावी लागणार असली तरी युतीच्या जागावाटपात मोठा प्रेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शिवसेना भाजप युतीची चर्चा काही दिवसातच सुरू होणार असून या वादग्रस्त जागा कुणाकडे जाणार याकडे पक्षांतर केलेल्या नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

रत्नागिरी जिल्हयातील गुहागर मतदारसंघ पारंपारिक भाजपकडे आहे. आता राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्याने साठी शिवसेना दावा करणार आहे. 2009 साली रत्नागिरी शहर मतदारसंघ भाजप लढवत होता मात्र सघ्या सेनेचे विद्यमान उदय सामंत असल्याने या जागेवर शिवसेना हक्‍क सांगणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे होता आता राणा जगजितसिंह यांच्यासाठी भाजप या मतदारसंघावर दावा करेल.

नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघ सेनेकडे होता, आता संदीप नाईक यांना भाजपकडून लढायचे आहे. मुंबईतीन वडाळा सेनेकडे असताना कॉंग्रेसमधून भाजपात दाखल झालेले कोळंबकर भाजपकडे तिकिट मागत आहेत इंदापूर देखिल सेनेकडे होता मात्र आजच हर्षवर्धन पाटील भाजपात दाखल झाल्याने त्यांना तिकिट द्यावे लागणार आहे. सातारा मतदारसंघ सेनेकडे होता, आता शिवेंद्र राजेभोसले यांच्यासाठी भाजप प्रयत्न करेल. माण खटावही सेनेकडे होता आता जयकुमार गोरे भाजपाकडून इच्छुक आहेत. मुंबईतील कालिनातून सेनेचे संजय पोतनीस आमदार आहेत. आता कृपा शंकर सिंह भाजपकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

हे देखिल वाचा -

साताऱ्यातील दिग्गजांच्या प्रवेशाचा शुक्रवारी मुहुर्त?

उदयनराजे १४ ला दिल्लीत, १५ ला महाजनादेश यात्रेत

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख