BJP may face hurdles in Latur municipal corporation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

लातूर महापालिकेतील सत्तेच्या खेळात कॉंग्रेसचा खोडा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

संख्याबळाच्या आधारावर सर्वसाधारण सभेत भाजपचे बहुमत असले तरी स्थायीसमितीत मात्र बहुमता अभावी भाजपला दोन प्रभाग समित्यांच्या सभापती पदावरपाणी सोडावे लागण्याची शक्‍यता आहे.

लातूर : झिरोवरून 36 नगरसेवकांची संख्या गाठत हिरो ठरलेल्या भाजपलामहापालिकेतील सत्तेत कॉंग्रेसचा खोडा अडचणीचा ठरणार असे दिसते.

संख्याबळाच्या आधारावर सर्वसाधारण सभेत भाजपचे बहुमत असले तरी स्थायीसमितीत मात्र बहुमता अभावी भाजपला दोन प्रभाग समित्यांच्या सभापती पदावरपाणी सोडावे लागण्याची शक्‍यता आहे.

 भाजपचा महापौर, उपमहापौर होण्यातअडचण नसली तरी महत्वाच्या स्थायी समितीसह परिवहन समितीत भाजपला बहुमतमिळणार नाही. परिणामी चारपैकी दोन प्रभाग समित्यांची सभापतिपदेकॉंग्रेसकडे जाण्याची दाट शक्‍यता आहे.

महापालिकेत भाजपचे 36 तर कॉंग्रेसचे 33 नगरसेवक निवडून आले आहेत. याकाठावरच्या बहुमतावर भाजप महापौर व उपमहापौरपद सहज आपल्याकडे राखू शकतो.सर्वसाधारण सभेतील ठरावही बहुमताच्या जोरावर भाजप मंजुर करून घेऊ शकते.

मात्र पालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समितीत भाजपलाबहुमतापासून दूर राहावे लागणार आहे. स्थायी समितीमधील 16 सदस्य त्या त्यापक्षांच्या नगरसेवकांच्या संख्येवरूननिवडले जातात. त्यानुसार भाजपचे व कॉंग्रेसचे प्रत्येकी आठ म्हणेजच समानसदस्य निवडून येतील.

त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजप वकॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले, तर चिठ्ठीवर सभापती निवडावा
लागेल. भाजपचा सभापती झाल्यास भाजपचे सात तर कॉंग्रेसचे आठ सदस्य उरतील.त्यामुळे स्थायीतील ठराव मंजुरीच्या वेळी बरोबरी झाली तरच सभापतींनामतदानाचा अधिकार मिळू शकतो. त्यामुळे भाजपचे ठराव कॉंग्रेस आठच्या म्हणजेच बहुमताने फेटाळू शकते किंवा सभापतींचे मत गृहित धरले तर बरोबरी
होऊन भाजपला कोणताही ठराव संमत करून घेणे अडचणीचे ठरणार आहे.

भाजपची कोंडी

स्थायी प्रमाणेच परिवहन समितीमध्येही भाजपची अशीच कोंडी होण्याची शक्‍यतानाकारता येत नाही. 12 सदस्यांच्या या समितीत पक्षीय बलाबलाचा विचार केलातर कॉंग्रेस व भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य निवडून येतील.स्थायी समितीचे
सभापती हे परिवहन समितीचे पदसिद्ध सदस्यअसतात. त्यामुळे परिवहन समितीत भाजपला काठावरले बहुमत मिळू शकेल. मात्र,ठराव मंजुरीच्या वेळी भाजपला कसरतकरावी लागणार आहे.

पालिका हद्दीतील चार क्षेत्रीय कार्यालयांच्यारचनेनुसार समित्या स्थापन होतील. त्यामुळे काही प्रभागांत भाजप तरकाही प्रभागांत कॉंग्रेसला बहुमत आहे. त्यामुळे महापालिकेत बहुमत असले
तरी भाजपची शतप्रतिशत सत्ता राहणार नाही. अवघे तीन सदस्य कमी असल्यानेसत्तेपासून दूर गेलेल्या कॉंग्रेसला किमान अर्ध्या शहराची सत्ता मिळणारआहे. शिवाय स्थायी समिती व परिवहन समितीत बरोबरीचा वाटादेखील मिळेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख