भाजपमध्ये "एकला चलो रे'ला मराठा आरक्षणाचे बळ 

भाजपमध्ये "एकला चलो रे'ला मराठा आरक्षणाचे बळ 

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडवला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून सुमारे 5 टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली असून विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने केलेल्या सर्व्हेक्षणात समोर आले आहे.

यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडून 2014 प्रमाणे दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढावे यासाठी भाजपमधील एक गट सक्रीय झाला असल्याचे सूत्रांकडून समजते. 

मागील लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि इतर घटक पक्ष महायुतीच्या झेंडयाखाली लढले होते. त्यानंतर भाजपने चर्चेचे गु-हाळ शेवटपर्यत लांबवत ऐनवेळी शिवसेनेबरोबरील युती तोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली होती. याचा लाभ भाजपला त्यावेळी झाला आणि 123 जागा मिळवत भाजपने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. 

याच प्रमाणे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपने स्वबळावर लढावे. मागील खेपेस तशी तयारी नसताना राज्यात भाजपचे सर्वाधिक 123 आमदार निवडूण आले. यावेळेस केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार विक्रमी जागा जिंकून दुस-यांदा विराजमान झाले आहे. तर राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून मराठा समाजाच्या आरक्षणाचा कळीचा मुददा सोडवला आहे. 

यामुळे भाजपच्या मतात पाच टक्‍के इतकी वाढ होउ शकते, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याच आधारे राज्यात भाजपने सर्व 288 जागा स्वबळावर लढवल्या तर नक्‍कीच 150 पेक्षा जास्त जिंकून येण्याची खात्री भाजपमधील काही धुरिणांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडावी, असे या गटाला वाटत आहे. 

विजयी उमेदवारांना प्राधान्य दयावे 
भाजपने स्वबळावर निवडणुक लढवावी या मताच्या भाजपमधील गटाचे म्हणणे आहे की ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमकुवत आहे, अशा ठिकाणी इतर पक्षातील ताकदवर उमेदवाराला पक्षप्रवेश देउन ती जागा बळकट करावी. कॉंग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांतील अनेक आजी आणि माजी आमदार तसेच ताकदवान राजकीय घराणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत. त्यांना पक्षात प्रवेश दयावा व स्वबळावर सरकार स्थापन करावे, असे म्हणणे या गटाचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com