शिवसेनेच्या नांदगाव'मध्ये भाजपच्या मनिषा पवारांची तयारी

.
Manisha-Pawar-BJP
Manisha-Pawar-BJP

नाशिक :  राजकीय घडामोडींमुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघ गेले काही दिवस चर्चेत आहे. युतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर कॉंग्रेस आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे . मात्र दोन्ही कॉंग्रेस सुस्त आहेत . भारतीय जनता पक्षाने बुथस्तरापर्यंत तयारी केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या सभापती मनिषा पवार यांनी गेले काही महिने सुरु ठेवलेल्या संपर्कामुळे तयारी अन्‌ उमेदवारीची दावेदारी दोन्हींत त्या सर्वात पुढे आहेत. 

सातत्याने टंचाई व अवर्षग्रस्त अशी स्थिती या मतदारसंघात आहे. शहरातील नांदगाव आणि मनमाड या दोन्ही नगरापलिकांत दहा ते बारा दिवसांच्या रोटेशनने पिण्याचे पाणी मिळते.

 या स्थिती बदलण्याच्या अपेक्षेने येथील कार्यकर्ते, नेते, जनतेने अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. मात्र हा प्रश्‍न एव्हढा जटील आहे की तो सुटण्याऐवजी बिकट होत गेला आहे. 

यावर सभापती मनिषा पवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्या पुढाकाराने उत्तर सापडले आहे. करंजवन धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाण्याची 298 कोटींची योजना त्यांनी पुढे आणली.

 त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यामार्फत योजनेचा  मार्ग मोकळा झाला.

त्यामुळे मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न सुटण्याची चिन्हे आहेत. निवडणूकीतील हा महत्वाचा प्रश्‍न असतो. त्यामुळे यानिमित्ताने मनिषा पवार सध्या भाजपच्या उमेदवारीच्या दावेदार व तयारीतही सर्वांच्या पुढे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांना एक पाऊल मागे जावे लागेल अशी स्थिती आहे.

नांदगाव मतदारसंघात भाजपने गेल्या आठवड्यात भाजप नेते डॉ. राजेंद्र फडके यांच्या उपस्थितीत शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा घेतला. मतदारसंघातील सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर, मंडल पदाधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, पेजप्रमुख, शाखाप्रमुख, विविध आघाडी व युवा मोर्चा यांच्यासह पक्षाचे सामान्य सदस्य व कार्यकर्त्यांचे संमेलन झाले. 

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना थेट निवडणूकीच्या तयारीला लागा असा संदेश दिला. त्यामुळे एकीकडे शिवसेना नेते 'आमच ठरलय' असे म्हणत तोंडावर बोट ठेवण्याचा सल्ला देत असतानाच भाजपने या मतदारसंघात यशस्वी चाचपणी केली. त्यामुळे नवी समिकरणे, जागांची अदला बदल होणार का  याविषयी चर्चा आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com