आयारामांमुळे भाजपमधील निष्टावंतांची परवड! 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना भाजपमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, राज्यातील राजकारणातील अनेक घराणी 'मेगाभरती'च्या रुपाने भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. तर काही नेते, त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी फिल्डींग लावून बसले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये सध्या इनकमिंग सध्या जोरात सुरू आहे.
आयारामांमुळे भाजपमधील निष्टावंतांची परवड! 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आलेल्या आयारामांमुळे भाजपमधील निष्टावंतांची परवड सुरू झाली आहे. पक्षासाठी आयुष्यभर ज्यांच्या विरोधात खस्ता खाल्या. माथाफोडी केली. अखेर त्यांच्याच नावांचा जयजयकार करण्याची वेळ भाजपमधील निष्टावानावर आल्याने हे निष्टावान नाराज झाले आहेत. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना भाजपमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, राज्यातील राजकारणातील अनेक घराणी 'मेगाभरती'च्या रुपाने भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. तर काही नेते, त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी फिल्डींग लावून बसले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये सध्या इनकमिंग सध्या जोरात सुरू आहे. 

विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आदी सर्वच भागातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मातब्बर मंडळी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. नगर जिल्हयातील विखे-पाटील, पिचड, सोलापूरमध्ये मोहितेपाटील, सातारा जिल्हयात नाईक-निंबाळकर, भोसले आदी घराण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी भाजपचे निष्टावान कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मागील 15- 20 वर्षांत या घराण्यांच्या विरोधात संघर्ष करीत पक्ष विस्ताराचे काम केले आहे. अशावेळी भाजपचे निष्टावान कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून आम्ही आता जे पक्षात आले आहेत. त्यांच्याविरोधात उभा संघर्ष केला. मात्र आता त्यांच्याच नावांचा जयजयकार करण्याची पाळी आमच्यासारख्या निष्टावान पदाधिका-यावर आली आहे, अशी खंत सातारा जिल्हयातील भाजपच्या एका पदाधिका-याने व्यक्‍त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com