सानप यांचा पत्ता कट; 'मनसे'च्या राहुल ढिकलेंना भाजप उमेदवारीचे 'रिटर्न गिफ्ट'?

भारतीय जनता पक्षात काहीही चमत्कार घडू शकतो, यावर आता सगळ्यांचाच विश्‍वास बसेल, असे चित्र आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपकडे पक्षातील सोळा इच्छुक होते. बाळासाहेब सानप हे विद्यमान आमदार आहेत. मात्र पक्षाने आज 'मनसे'ची उमेदवारी हुकलेले व भाजपचे प्राथमिक सदस्यही नसलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली असून सायंकाळी ती जाहीर होईल,असे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.
Balasaheb Sanap - Rahul Dhikle Nashik
Balasaheb Sanap - Rahul Dhikle Nashik

नाशिक : भारतीय जनता पक्षात काहीही चमत्कार घडू शकतो, यावर आता सगळ्यांचाच विश्‍वास बसेल, असे चित्र आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपकडे पक्षातील सोळा इच्छुक होते. बाळासाहेब सानप हे विद्यमान आमदार आहेत. मात्र पक्षाने आज 'मनसे'ची उमेदवारी हुकलेले व भाजपचे प्राथमिक सदस्यही नसलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली असून सायंकाळी ती जाहीर होईल,असे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले. 

या उमेदवारीसाठी पडद्यामागून वेगळीच सूत्रे हलली. त्यात पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी स्विकारण्याची हमी घेण्यात आली. त्याचे 'रिटर्न गिफ्ट' म्हणून ढिकले यांना उमेदवारी मिळाल्याचे बोलले जाते. नाशिक पूर्व मतदारसंघात विद्यमान आणदार तसेच माजी शहराध्यक्ष, एकेकाळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे विश्‍वासु अशी ख्याती असलेले सानप विद्यमान आमदार आहेत. त्यांनी शहर तसेच जिल्ह्यातील अनेक महत्वाचे निर्णय घेत असत. त्यामुळे पक्षासह महापालिकेच्या कारभारावरही त्यांची पकड होती. मात्र, गेले काही दिवस वरिष्ठ नेत्यांची मर्जी खप्पा झाल्याने ते बॅकफुटवर होते. 

त्याचा लाभ घेत एकेकाळी त्यांचे सहकारी असलेल्या नगरसेवकांनीही त्यांची साथ सोडली होती. त्यांच्या विरोधात पक्षातील सुनिल बागूल, संभाजी मोरुस्कर, उध्दव निमसे, अरुण पवार, सुनिल आडके आदी पंधरा जणांनी उमेदवारी मागीतली होती. दोन दिवसांपूर्वी या सर्व विरोधकांनी एकत्र येत त्यांनी थेट गिरीश माहजन यांची भेट घेतली होती. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनीही महाजन यांची भेट घेत उमेदवारीचा आग्रह केला. मात्र, दोन्ही गटांना काहीही आश्‍वासन न मिळाले नाही. ते रिकाम्या हाती परतल्याने तेव्हाच तिसऱ्याच कोणाला उमेदवारी मिळेल असे संकेत मिळाले होते. अखेर आज मुंबईत झालेल्या बैठकीत नाशिक पूर्व मतदारसंघाचा निर्णय गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. आज सायंकाळी त्याची अधिकृत घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगीतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com