BJP leads in VIdharbha | Sarkarnama

विदर्भातील पंचायत समित्यांमध्ये भाजपची मुसंडी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद व महानगरपालिकांप्रमाणेच नुकत्याच झालेल्या पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने अक्षरशः मुसंडी मारली.

नागपूर :  जिल्हा परिषद व महानगरपालिकांप्रमाणेच नुकत्याच झालेल्या पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने अक्षरशः मुसंडी मारली.

विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील 74 पंचायत समित्यांपैकी 30 पंचायत समितींवर भाजपचा भगवा स्वबळावर फडकणार आहे. ग्रामीण राजकारणात बलवान समजली जाणारी कॉंग्रेस मात्र केवळ 14 जागीच स्वबळावर सत्ता मिळवू शकते. 9 पंचायत समित्यांमधील सत्ताकारण मात्र तेथील त्रिशंकू स्थितीमुळे अस्थिरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधील 78 पंचायत समितींपैकी 74 पंचायत समितींसाठी निवडणूक झाली होती. या 74 पंचायत समित्यांमधील 648 सदस्यांना निवडून द्यायचे होते. त्यापैकी 266 सदस्य एकट्या भाजपचे निवडून आले आहे. त्या पाठोपाठ 173 सदस्य निवडून आणणारी कॉंग्रेस आहे.

शिवसेनेने 89 जागा जिंकून तिसरे स्थान, तर 52 जागा जिंकून राष्ट्रवादी चौथ्या स्थानावर आहे. बसपाचे 4 व दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचे 3 सदस्य निवडून आले. स्थानिक पातळीवरच्या पक्षांचे 28 आणि पक्ष 33 सदस्य आहेत. चंद्रपूर व वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये तर भाजपने अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या आहेत. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात भाजप दुसऱ्या स्थानावर आहे.

अमरावतीत 31 जागा जिंकणारी कॉंग्रेस, तर यवतमाळात 41 जागा जिंकणारी शिवसेना पहिल्या स्थानावर आहे. अन्य चार जिल्ह्यांमध्ये भाजप नंबर वन आहे. 

पंचायत समितींमधील सत्ताकारणातील वर्चस्व पुढीलप्रमाणे आहे. बुलडाणा जिल्हा ः भाजप - चिखली, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर; शिवसेना - लोणार; कॉंग्रेस - मोताळा, नांदुरा; राष्ट्रवादी - देऊळगाव राजा; भारिप बमसं - शेगाव; त्रिशंकू - बुलडाणा, मेहकर व सिंदखेडराजा. यापैकी मेहकरमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र आल्यास व सिंदखेड राजात भाजप - सेना एकत्र आल्यास सत्ता स्थापन करू शकतात. 

अमरावती जिल्हा ः भाजप - अचलपूर, मोर्शी; कॉंग्रेस - नांदगाव खंडे., अमरावती, वरूड, चिखलदरा; प्रहार - चांदूर बाजार; त्रिशंकू - भातकुली, अंजनगाव सूर्जी, दर्यापूर. 

यवतमाळ जिल्हा ः भाजपा - बाभुळगाव, नेर परसोपंत, घा'जी, वणी; शिवसेना - लोणार; कॉंग्रेस - मोताळा, नांदुरा; राष्ट्रवादी - देऊळगाव राजा; भारिप बमसं - शेगाव; त्रिशंकू - बुलढाणा, मेहकर व सिंदखेडराजा. यापैकी मेहकरमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र आल्यास व सिंदखेड राजात भाजपा - सेना एकत्र आल्यास सत्ता स्थापन करू शकतात. 

जिल्हा : सदस्यसंख्या 
(1) बुलडाणा जिल्हा 
एकूण पं.स. - 13 
एकूण सदस्य - 120 
भाजप - 39 
शिवसेना - 26 
कॉंग्रेस - 31 
राष्ट्रवादी - 13 
स्थानिक पक्ष - 10 
अपक्ष - 1 

(2) अमरावती जिल्हा 
एकूण पं.स. - 10 
एकूण सदस्य - 88 
भाजप - 23 
शिवसेना - 10 
कॉंग्रेस - 31 
राष्ट्रवादी - 4 
बसपा - 2 
भाकप - 1 
स्थानिक पक्ष - 13 
अपक्ष - 4 

(3) यवतमाळ जिल्हा 
एकूण पं.स. - 16 
एकूण सदस्य - 122 
भाजप - 33 
शिवसेना - 41 
कॉंग्रेस - 25 
राष्ट्रवादी - 18 
भाकप - 1 
माकप - 1 
अपक्ष - 3 

(4) वर्धा जिल्हा 
एकूण पं.स. - 8 
एकूण सदस्य - 104 
भाजप - 59 
शिवसेना - 4 
कॉंग्रेस - 29 
राष्ट्रवादी - 4 
बसपा - 2 
अपक्ष - 6 

(5) चंद्रपूर जिल्हा 
एकूण पं.स. - 15 
एकूण सदस्य - 112 
भाजप - 70 
शिवसेना - 5 
कॉंग्रेस - 33 
राष्ट्रवादी - 1 
अपक्ष - 3 

(6) गडचिरोली जिल्हा 
एकूण पं.स. - 12 
एकूण सदस्य - 102 
भाजपा - 42 
शिवसेना - 3 
कॉंग्रेस - 24 
राष्ट्रवादी - 12 
स्थानिक पक्ष - 5 
अपक्ष - 16 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख