पुणे पालिकेतील भाजप नेत्यांना देवेंद्र फडणविसांनी काय सांगितले?

...
पुणे पालिकेतील भाजप नेत्यांना देवेंद्र फडणविसांनी काय सांगितले?

पुणे : पुण्यातील प्रकल्पांत आडकाठी आणणाऱ्या ठाकरे सरकारच्या धास्तीने महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेऊन, सरकारविरोधातील नव्या रणनीतीचा "धडा' घेतला.

नव्या सरकारचे आक्षेप आणि आपल्या अजेंड्याच्या अंमलबजावणी यावर फडणवीस यांच्यासमवेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहानेत्यांनी पाऊणतास चर्चा केली. मात्र, चर्चेच्या तपशिलाबाबत या तिघांनी तोंडावर बोट ठेवणे पसंत केले. "ही सदिच्छा भेट होती,' इतकेच मोजके उत्तर महापौर मुरलीधर मोहोळांनी दिले.

 
महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपपुढे अडचणी उभ्या करण्याची एकही संधी ठाकरे सरकार सोडत नसल्याचे चित्र आहे. भाजपने गेल्या तीन-पावणेतीन वर्षात आखलेल्या काही प्रकल्पांवर सरकारने आक्षेप घेतले आहेत. विशेषत: माजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या "मेडिकल कॉलेज'च्या "ट्रस्ट'ची मंजुरी थांबविण्याची कार्यवाहीही सरकार पातळीवर सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नेमलेल्या नवे पदाधिकारी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे हे आपल्या कामाची छाप पाडण्याच्या बेतात आहेत. त्यादृष्टीने गेल्या तीन वर्षांतील कारभारात काही बदल करून आपल्या पक्षाचा करिष्मा उमटविण्याचा या मंडळींचा प्रयत्न आहे. मात्र, सरकारचा हस्तक्षेप डोकेदुखी ठरत असल्याने मोहोळ, रासने आणि घाटेंनी मुंबईत फडणवीस यांची घेत आणि आपले गाऱ्हाणे मांडले. 

त्याशिवाय, पुण्यातील विविध प्रकल्पांची आखणी, तिची अंमलबजावणीचा वेग आणि पुढच्या दोन वर्षातील कारभार यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हाच, विधानसभा निवडणुकीतील पडझड कामातून भरून काढण्याचा शब्द पदाधिकाऱ्यांना फडणवीस यांना दिल्याचेही समजते. 

महापौर मोहोळ म्हणाले, ""नवे पदाधिकारी निवडल्यानंतर फडणवीस यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्यासह चारही पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.''.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com