गुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप नेते - BJP Leaders from Mumbai will Campaign in Gujrat | Politics Marathi News - Sarkarnama

गुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप नेते

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुंबईसह राज्यातील डझनभर भाजप  नेते प्रचारात उतरणार असल्याचे समजते. 

मुंबई :  देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुंबईसह राज्यातील डझनभर भाजप  नेते प्रचारात उतरणार असल्याचे समजते.   

गुजरातमध्ये 9आणि 14  डिसेंबरला निवडणुका होणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा  उडविला जात असताना गेली 22 वर्षे सत्तेत असलेल्या सत्ताधारी भाजपला जेरीस आणण्याचे काम विरोधी पक्षांकडून केले जात आहे . त्यामुळे प्रचारात कुठेही कमी पडू नये याची जबाबदारी भाजपकडून घेतली जात आहे.                                                  

नोटबंदी, जीएसटीचा फटका मुंबईतील गुजराती व्यापाऱ्यांना बसला. त्यामुळे व्यापारी , मध्यमवर्गीय नाराज आहेत. असे बोलले जाते.  फाजील आत्मविश्वास नडू नये यासाठी गुजरातच्या प्रचारात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री भाजपची धुरा सांभाळत आहेत. पक्षकार्यात आपलाही सहभाग असावा यासाठी महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिकेतील गुजराती भाषिक नगरसेवक हे आपल्या गावाकडील जिल्ह्यात प्रचारासाठी जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, भाजपचे प्रतोद राज पुरोहित, मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता हे गुजरातमध्ये प्रचारासाठी जाणार नसल्याचे समजते. सुरत भागात उत्तरभारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय पदाधिकारीही या भागात जाऊन प्रचार करणार असल्याचे समजते. मात्र महाराष्ट्र भाजपकडून अद्याप अधिकृत प्रचार दौरा निश्चित केला नसल्याचे सांगण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख