सेनेचे संख्याबळ तपासून पहावे - भाजप करणार राज्यपालांकडे मागणी

राज्यपालांनी शिवसेनेचे संख्याबळ मान्य करु नये, ते तपासून पहावे असे सांगत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेनेने संपूर्ण आकडेवारी राज्यपालांकडे सादर करावी असे भाजपचे म्हणणे आहे.
Rift in BJP Shivsena Alliance in Maharashtra
Rift in BJP Shivsena Alliance in Maharashtra

मुंबई : राज्यपालांनी शिवसेनेचे संख्याबळ मान्य करु नये, ते तपासून पहावे असे सांगत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेनेने संपूर्ण आकडेवारी राज्यपालांकडे सादर करावी असे भाजपचे म्हणणे आहे. 

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक वर्षा बंगल्यावर सकाळी झाली. राज्यातले महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेचे संख्याबळ मान्य करु नये, अशी विनंती भाजप राज्यपालांना करणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. राज्यपाल कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com