मोदींच्या शिर्डी दौऱ्यासाठी भाजप नेत्यांना लाखाच्या  गर्दीचे टार्गेट

भाजपकडून जय्यत तयारी : भानुदास बेरडपंतप्रधानांच्या शिर्डी येथील आगमनासाठी भाजपच्यावतीने मागील महिन्यांपासून नियोजन सुरू आहे. त्यामध्ये बैठका घेवून प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुका व गावनिहाय बैठकांमध्ये नियोजन झाले असून, सुमारे दीड लाख लोक येतील, अशी शक्यता असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
saibaba_Modi
saibaba_Modi

नगर,: साईसमाधी शताब्दी वर्षाच्या समारोपासाठी उद्या (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तब्बल एक लाख लोकांची गर्दी करण्याचे टार्गेट भाजप नेत्यांना आहे. त्यापैकी ४० हजारांची गर्दी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी कुटुंबियांची असेल. उर्वरित ६० हजार लोक जमविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

भाजपच्या दृष्टीने पंतप्रधानांचा दाैरा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते जिल्ह्याच्या दृष्टीने काहीतरी महत्त्वाची घोषणा करतील, अशी आशा जिल्ह्यातील लोकांना आहे. या दाैऱ्याचा फायदा निवडणुकांना होण्यासाठी भाजप नेत्यांनी मोठी तयारी केली आहे.

यांच्यावर गर्दीची खास जबाबदारी

पालकमंत्री प्रा. राम शिंदे

आमदार बाळासाहेब मुरकुटे

आमदार शिवाजी कर्डिले

आमदार स्नेहलता कोल्हे

भाजपने केले असे नियोजन

प्रारंभी प्रत्येक तालुक्यात बैठका घेतल्या

प्रत्येक गावातून लोक येतील अशी व्यवस्था

भाजपच्या सर्व शाखांमधून लोक येण्यासाठी व्यवस्था

जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार

पोलिस प्रशासनाची अशी तयारी

पोलिस कर्मचारी - २५००

अतिरिक्त पोलिस अधीक्षक – ७

पोलिस उपअधीक्षक – १७

पोलिस निरीक्षक – ५०

पोलिस उपनिरीक्षक – १५०

राखीव दल – २ कंपन्या

एटीएस – ४ पथके

बाॅम्बशोधक पथक – ९

व्हिडिओ कॅमेरे - २५०

ड्रोन – गरजेनुसार वाढविणार

शीघ्र कृतीदल – ८ पथके

दंगलनियंत्रण पथक – ६

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com