भाजप नेत्यांची `संघा'कडे धाव कशासाठी? 

केंद्रीय मंत्री उमा भारती पाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याने भाजप नेत्यांची "संघा'कडे धाव कशासाठी? असा प्रश्‍न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
भाजप नेत्यांची `संघा'कडे धाव कशासाठी? 

नागपूर : केंद्रीय मंत्री उमा भारती पाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याने भाजप नेत्यांची "संघा'कडे धाव कशासाठी? असा प्रश्‍न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक व निवडणुकीनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये "संघा'ची भूमिका मध्यवर्ती राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या नेत्यांच्या संघाच्या मुख्यालयातील वाढत्या भेटीने नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती. दोन दिवसांनीच भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी भेट देऊन रा. स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते मोदी विरोधी गटातील मानले जातात.
 
उमा भारती यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. उमा भारती यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हायचे आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उमा भारती मध्यप्रदेशात भाजपच्या संघटनेमध्ये मोठे पद किंवा प्रदेशाध्यक्षपदावर डोळा ठेऊन आहे. या हेतूने त्यांनी संघ मुख्यालयात पेरणी केल्याचे समजते. 

मोदी व शहांची राजवट सुरू झाल्यानंतर डॉ. मुरलीमनोहर जोशी राजकीयदृष्टीने अडगळीत पडलेले आहेत. भाजपच्या धोरणानुसार पंचाहत्तरी पार केलेल्या डॉ. जोशी यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्‍यताही नाही. लोकसभा निवडणूक नाही तर पुढे काय? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी डॉ. जोशी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्याचे समजते. उमा भारती व डॉ. जोशी या दोन्ही नेत्याचे संघ वर्तुळात संबंध व प्रभाव असल्याने या दोन्ही नेत्यांच्या विनंतीला संघ नेत्यांनाही "मान' द्यावा लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com