भाजप नेते वसंत गितेंच्या अभ्यासिकेत घडले अठरा अधिकारी  - BJP Leader Vasant Gite's Study Hall | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेते वसंत गितेंच्या अभ्यासिकेत घडले अठरा अधिकारी 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 8 जुलै 2018

बालपणापासुन सायकलपटु असलेले गिते यांनी सायकलिंगच्या प्रसारासाठी प्रदिर्घ काम केले आहे. त्यांच्या मुंबई नाका मित्र मंडळातर्फे त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महापालिकेत नगरसेवक म्हणुन काम करतांना नागरीकांसाठी विविध उपक्रम राबविले. शहराचे महापौर झाल्यावर त्यांनी शहरातील अभ्यासिकांना प्रोत्साहन दिले. 2009 मध्ये शहराचे आमदार झाल्यावर मुंबई नाका परिसरात त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्य केले.

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार वसंत गिते यांचा राजकारणापेक्षा सामाजिक उपक्रमांसाठी लौकीक आहे. त्यांच्या संस्थेच्या स्व. कमळाबाई निवृत्ती गिते अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यातुन यंदा अठरा विद्यार्थी विविध स्पर्धा परिक्षांत यशस्वी होऊन अधिकारी बनले आहेत. या विद्यार्थ्यांचा आज गिते यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

बालपणापासुन सायकलपटु असलेले गिते यांनी सायकलिंगच्या प्रसारासाठी प्रदिर्घ काम केले आहे. त्यांच्या मुंबई नाका मित्र मंडळातर्फे त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महापालिकेत नगरसेवक म्हणुन काम करतांना नागरीकांसाठी विविध उपक्रम राबविले. शहराचे महापौर झाल्यावर त्यांनी शहरातील अभ्यासिकांना प्रोत्साहन दिले. 2009 मध्ये शहराचे आमदार झाल्यावर मुंबई नाका परिसरात त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्य केले. येथील अभ्यासिकेत तीनशेहून अधिक विद्यार्थी नियमितपणे अभ्यासाला येतात. यातील अठरा विद्यार्थी यंदा स्पर्धा परिक्षांत चमकले. त्यांचा आज सत्कार झाला. 

या यशस्वी विद्यार्थ्यांत शुभम पाटील (वायुसेना), अण्णासाहेब वायबसे (लिपीक), गणेश माळी (विक्रीकर निरिक्षक), चिन्मय सराफ, प्रविण कदम, सुशिल रामराजे (बॅंकींग), निरज बोकील, विनोद खांडबहाले, संतोष पगारे, सिमा खडांगळे, रमेश रुमणेसमाधान भाटेवाल, सदाशिव कणसे (पोलीस उपनिरिक्षक), गणेश लव्हाटे, मनियार शहारुख, अविनाश पाटील, सुरेश शिंदे (आर.टी.ओ.), शिवाजी थापेकर (न्यायाधीश) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख