संभाजी पाटील निलंगेकरांच्या विजयासाठी संपुर्ण कुटुंब मैदानात

निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विक्रमी मताधिक्‍याच्या विजयासाठी अख्खे कुटुंब रस्त्यावर उतरले आहे. आई, पत्नी, लहान भाऊ, बहिण असे सर्वजण झपाटून प्रचाराला लागल्याने मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
BJP Leader Sambhaji Patil Nilangekar Family in Election Campaign
BJP Leader Sambhaji Patil Nilangekar Family in Election Campaign

निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विक्रमी मताधिक्‍याच्या विजयासाठी अख्खे कुटुंब रस्त्यावर उतरले आहे. आई, पत्नी, लहान भाऊ, बहिण असे सर्वजण झपाटून प्रचाराला लागल्याने मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

निलंगा विधानसभा मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते जनसंपर्क करीत आहेत. आपली भूमिका मतदारांसमोर मांडत आहेत. प्रचाराच्या या मोहिमेत उमेदवारांची कुटुंब देखील सहभागी झाल्याचे पहायला मिळत आहेत. निलंगा मतदारसंघात देखील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे कुटुंबिय त्यांच्यासाठी मतदारांना आवाहन करतांना दिसताहेत. 

संभाजीपाटील निलंगकेरांनी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढली. या माध्यामातून 185 गावांत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या यात्रे दरम्यान, सरकारच्या काळात लातूर जिल्ह्यासाठी व मराठवाड्यासाठी केलेल्या विकासकांमाची माहिती ते मतदारांना देत आहेत. निलंगेकर यांच्या आई माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर निवासस्थानी बसून मतदारांच्या भेटी घेत आहेत, तर जेष्ठांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत.

निलंगेकरांचे बंधु युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडून गावागावात बैठका प्रचार सभा, भेटीगाठी सुरू आहेत. तसेच ते सभाही गाजवत आहेत. मोठ्या भावाच्या प्रचारात त्यांनी झोकून दिल्याचे चित्र आहे. प्रचाराची संपूर्ण जबाबदारीच त्यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसते. प्रचाराचे नियोजन, सभा, रथयात्राचा मार्ग याबाबतची आखणी करून थेट मतदारांशी संपर्क साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

निलंगेकर यांच्या पत्नी प्रेरणा यांनीही मतदार संघातील सत्तर ते ऐंशी गावांमध्ये प्रचार मोहीम सुरू केली असून महिलांच्या बैठका, मेळावे, पदयात्रेच्या माध्यमातून त्या मतदारांशी संवाद साधत आहेत. केंद्र व राज्य शासनाने महिलांसाठी राबवलेल्या योजना, धोरणांची माहिती पोहचवत आहेत. निलंगेकर यांच्या भगिनी प्राजक्ता मारवा, भावजय समिदा या देखील प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. संभाजी पाटील निलंगेकर यांना केवळ एक लाखाहून अधिक मतांनी निवडून आणण्याचा संकल्प त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांप्रमाणेच कुटुंबातील सदस्यांनी देखील घेतल्याची यानिमित्ताने चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com