अचानक समोर आला बिबट्या; भाजपच्या राजेश पिंगळेंनी उडवला फटाक्‍यांचा बार

गंगापूर धरणाचा कालवा वाहत असल्याने बिबट्यांचा सतत वावर असतो. रात्री नऊला भाजपचे पदाधिकारी राजेश पिंगळे सहकाऱ्यांसह येथून निघाले होते. अचानक त्यांच्यापुढे बिबट्या प्रकट झाला. परिसरातील नागरीकांनीही बिबट्याला पाहिल्यावर सगळ्यांचीच पळापळ झाली. प्रसंगावधान राखून त्यांनी बिबट्या थोडा बाजुला होताच त्यांनी पटकन दिवाळीला आणलेले व शिल्लक राहिलेले फटाके उडवले.गंगापूर धरणाचा कालवा वाहत असल्याने बिबट्यांचा सतत वावर असतो. रात्री नऊला भाजपचे पदाधिकारी राजेश पिंगळे सहकाऱ्यांसह येथून निघाले होते. अचानक त्यांच्यापुढे बिबट्या प्रकट झाला. परिसरातील नागरीकांनीही बिबट्याला पाहिल्यावर सगळ्यांचीच पळापळ झाली. प्रसंगावधान राखून त्यांनी बिबट्या थोडा बाजुला होताच त्यांनी पटकन दिवाळीला आणलेले व शिल्लक राहिलेले फटाके उडवले.
Bjp Leader Rajesh Pingle from Nashik Bursted Crackers to Run Away Leopard
Bjp Leader Rajesh Pingle from Nashik Bursted Crackers to Run Away Leopard

नाशिक : रात्रीचे नऊ वाजले होते. भाजप नगरसेविका सुनिता पिंगळे यांचा मुलगा राजेश व त्याचे मित्र रस्त्याने जात होते. गंगावाडी भागातील शेतमळ्यालगतच्या रस्त्यावर अवचित बिबट्याचे दर्शन झाले. सगळेच सुन्न झाले. काय करावे हे सुचत नसतांना बिबट्याला पळवण्यासाठी त्यांनी दिवाळीला आणलेले फटाके उडवले अन्‌ बिबट्याने शेतांकडे धुम ठोकली. तेव्हा परिसरातील नागरीकांचा जीव भांड्यात पडला.

शहरातील मखमलाबाद शिवारातील गंगावाडी भागात दोन दिवसांपूर्वी रात्री नऊला नागरी वसाहतीत नागरिकांना बिबट्या दिसला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या नगरसेविका सुनिता पिंगळे येथेच राहतात. परिसरात सर्व द्राक्षबागा आणि शेती आहे. लगत गंगापूर धरणाचा कालवा वाहत असल्याने बिबट्यांचा सतत वावर असतो. रात्री नऊला भाजपचे पदाधिकारी राजेश पिंगळे सहकाऱ्यांसह येथून निघाले होते. अचानक त्यांच्यापुढे बिबट्या प्रकट झाला. परिसरातील नागरीकांनीही बिबट्याला पाहिल्यावर सगळ्यांचीच पळापळ झाली. प्रसंगावधान राखून त्यांनी बिबट्या थोडा बाजुला होताच त्यांनी पटकन दिवाळीला आणलेले व शिल्लक राहिलेले फटाके उडवले.

मखमलाबाद जुनी वॉटर लाईन गंगावाडी भागात शेतमळे आहे. पाटालगत असलेल्या वस्तीतील तिडके यांनी सायंकाळी बिबट्यास बघितल्यानंतर परिसरात फटाके वाजविले, त्यावेळी बिबट्या गांधारवाडीकडे पळाला. रात्री नऊ वाजे च्या सुमारास पुन्हा बिबट्या फिरत असल्याचे नागरिकांनी बघितले म्हणून नागरिकांत भीती पसरली होती.

सायंकाळी मळयात असलेल्या वसाहतीत बिबट्याचा संचार असल्याची माहिती वनविभाग पोलिसांना कळवली व नंतर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार,पोलीस हवालदार सुरेश माळोदे, रोकडे व वन विभागाचे अधिकारी गंगावाडीत भेट देत पाहणी केली. बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांनी बघितल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी बिबट्याचे या गंगावाडी परिसरात काहीकाळ वास्तव्य होते.

या भागात बिबट्याचा सतत वावर असतो. त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. अनेकदा वनविभागाने पिंजरे लावून बिबटे पकडले. मात्र ते कमी होत नाहीत. सोमवारी दोनदा बिबट्या दिसल्यावर आम्ही फटाके वाजवून त्याला पळवले - राजेश पिंगळे, भाजप.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com