मी कुणाच्या बाजूने हे थेट प्रक्षेपणातून कळेल - अजित पवार

महाराष्ट्रामध्ये आज महा विकास आघाडीच्या सरकार वर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर व अजित पवार यांचीआज सकाळी झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते. मात्र, अजित पवार यांनी ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हतीया भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
BJP Leader Pratap Patil Chikhlikar Meets Ajit Pawar
BJP Leader Pratap Patil Chikhlikar Meets Ajit Pawar

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदारआणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास खलबत झाली. या दोघांच्या चर्चेत काय झाले याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान, अजित पवार कुणाच्या बाजूने हे थेट प्रक्षेपणातून लोकांना कळेल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

महाराष्ट्रामध्ये आज महा विकास आघाडीच्या सरकार वर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये आज सकाळी झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते. मात्र, अजित पवार यांनी ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हतीया भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. ते देवेंद्र फडणीस यांचे निकटवर्ती आहेत. अजित पवारांनी चिखलीकर यांच्या मध्ये यापूर्वी फार राजकीय शक्य असल्याचे कुठेही चर्चेत नव्हते असे असताना खासदार चिखलीकर यांनी सकाळी सव्वा आठच्या सुमाराला अजित पवार यांचे निवासस्थान गाठले. सुमारे पस्तीस मिनिटे अजित पवार यांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये चर्चा झाली. 

चिखलीकर रवाना झाले त्यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले आणि माझी झालेली भेट राजकीय नव्हती याचा अर्थ काढला जाऊ नये. श्री अजित पवार पुढे म्हणाले, "राजकीय दुष्मन असलो तरीही आमची ओळख असते.या भेटीचा अजिबात राजकीय अर्थ काढू नये. आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मी कुणाच्या संपर्कात नाही. आज वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणातून लोकांना अजित पवार कोणाच्या बाजूने उभा राहिला हे कळेल.''

''कोर्टाचा आदेशानुसार ठराव, मतदान होईल. संजय राऊत यांनी सांगितलेला 170 चा आकडा गाठला जाईल. उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार, सोनिया गांधी,उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी घेईन.'', असेही पवार म्हणाले. चिखलीकरांच्या भेटीनंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com