पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडेंची दांडी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. माजी ग्रामविकास मंत्री व परळीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पंकजा मुंडे बैठकीला अनुपस्थित होत्या.
BJP Leader Pankaja Munde Remain Absent for Party Meeting
BJP Leader Pankaja Munde Remain Absent for Party Meeting

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. माजी ग्रामविकास मंत्री व परळीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पंकजा मुंडे बैठकीला अनुपस्थित होत्या. 

चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, व्ही सतीश, विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत भाजपच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. माजी मंत्री अनिल बोंडे, राम शिंदे यांच्यासह वैभव पिचड, हर्षवर्धन पाटील, मोनिका रांजळे बैठकीला उपस्थित होते. पंकजा मुंडे बैठकाला का अनुपस्थित होत्या, त्याबाबत माहिती मिळू शकली नाही. तावडे कोअर कमिटीचे सदस्य म्हणून बैठकीला उपस्थित होते. 

दरम्यान, पराभूत उमेदवारांचा योग्य सन्मान करु असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ज्यांचा पराभव झाला त्यांना पक्षात जबाबदारी दिली जाणार, असे त्यांनी स्पष्ट केले. ५५ ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकांवर आहोत, असे त्यांनी सांगितले. पराभूत उमेदवार येत्या ग्रामपंचायत,जिल्हा परीषद,महानगरपालिका निवडणूक काळात पक्षाच्या विजयासाठी काम करतील, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com