गिरणारेच्या आदिवासींसाठी भाजपच्या नितीन गायकरांची माणुसकीची भिंत

भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नितीन गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक तालुक्‍यातील सर्वात मोठी अन्‌ सत्तर खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गिरणारे येथे 'माणुसकीचे भिंत' हा उपक्रम सुरु करण्यात आला
Humanity Wall at Nashik
Humanity Wall at Nashik

नाशिक : गंगापूर धरणाच्या उशाशी अन्‌ हरसूलच्या पायथ्याशी असलेले गिरणारे गाव म्हणजे आदिवासींची बाजारपेठ. या परिसरातील आदिवासी कायम येथे मुक्कामास असतात. सध्या थंडी वाढल्याने त्यांना रात्रभर कुडकुडत झोपावे लागते. येथील भाजपचे तालुका अध्यक्ष नितीन गायकर यांनी या आदिवासींसाठी माणुसकीची भिंत हाउपक्रम सुरु केला आहे. त्यात त्यानी सुमारे दोन हजार कपडे गोळा करुन आदिवासींना ऊब देण्याचे काम केले.

भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नितीन गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक तालुक्‍यातील सर्वात मोठी अन्‌ सत्तर खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गिरणारे येथे 'माणुसकीचे भिंत' हा उपक्रम सुरु करण्यात आला. गिरणारे गाव गंगापूर धरणालगत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बागाईत पिके व भाजीपाला उत्पादन घेतात. हा माल विक्रीसाठी गिरणारे येथेली बाजार उपआवारात येतो. येथे बाजार भरतो. त्यामुळे परिसरातील आदिवासी महिन्यातील 15 ते 20 दिवस येथे वास्तव्य करतात. रोजंदारी, शेतमजुरी व अन्य कामे करुन उदरनिर्वाह करतात. रात्री येथे उघड्यावर मुक्काम करतात. सध्या या भागात प्रचंड गारठा आहे. त्यात थंडीने कुडकुडत त्यांना रात्र घालवावी लागते. त्याची ही गैरसोय या उपक्रमाने दूर झाली आहे.

मोठ्या प्रमाणावर आदिवासी खेड्यातून मजूर व कष्टकरी येतात. त्यांना कपड्याची गरज भासते. ही अडचण दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न भाजपचे नितीन गायकर, अमोल मोरे व त्यांच्या मित्र परिवाराने यशस्वीपणे केला. या उपक्रमात जवळपास दोन हजार कपडे गोळा झाले. त्याची सुरवात नितीन गायकर यांनी फीत कापून केली. जेष्ठ नागरिक व सरपंच अलकताई दिवे, निवृत्ती घुले, बाळकृष्ण हंडोरे, आत्माराम थेटे, मंजुळताई गायकर, छबाबाई थेटे, अंजना लिलके, प्रवीण कोरडे, सुभाष खैरनार, संजय सूर्यवंशी, शंकर थेटे, अरुण थेटे, हिरामण म्हैसधुणे, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com