भाजपचे नेते वसंत गिते छगन भुजबळांच्या भेटीला..

राज्यातील 'ओबीसी' नेत्यांवर भाजपकडून अन्याय केला जातो. असे विधान नुकतेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नाराजीही लपून राहिलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मंंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे माजी आमदार वसंत गिते यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत
Bjp Leader Vasant Gite Meets Chagan Bhujbal At Nashik
Bjp Leader Vasant Gite Meets Chagan Bhujbal At Nashik

नाशिक : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार वसंत गिते यांनी आज भुजबळ फार्म येथे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. शहराच्या राजकारणात वसंत गिते कधीकाळी भुजबळांचे प्रतिस्पर्धी होते. ओबीसी नेत्यांवर भाजप पक्षात अन्याय होतो, या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते भेटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी वसंत गिते म्हणाले, "भुजबळ हे मोठे नेते आहेत. त्यांच्याशी माझे राजकारणा पलिकडचे व कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागत करायला आलो आहे. मी नेहेमीच त्यांचा आदर करतो.'' माजी आमदार गिते सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. महापालिकेच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघात ते उमेदवारीचे दावेदार होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. भाजपचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनाही उमेदवारी नाकारल्याने त्यांनी प्रारंभी राष्ट्रवादी व त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे समर्थक नगरसेवक नाराज असुन काही जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

राज्यातील 'ओबीसी' नेत्यांवर भाजपकडून अन्याय केला जातो. असे विधान नुकतेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नाराजीही लपून राहिलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाली. एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील ओबीसी नेत्यांवरील अन्यायाच्या वक्तव्याविषयी भुजबळ यांना विचारले असता, ते म्हणाले, "एकनाथ खडसे ज्येष्ठ व जाणकार नेते आहेत. ते मलाही भेटले होते. मात्र कुणाला भेटल्याने लगेच कोणी कुठल्या पक्षात जात नाही. खडसेंचा तसा काही विचार असल्यास राज्यातील राजकारणाचा विचार करुन ते योग्य ठिकाणी जातील.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com