....आणि रागावलेले गोपीनाथराव क्षणभरातच हसायला लागले

योगायोगाने सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली. मुंडे आणि माझे संबंध हे मित्राप्रमाणे होते आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करायचो. आज त्यांची जयंती असल्याने अनेक प्रसंग डोळ्यासामोर उभे राहिले असे सांगत विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांची एक आठवण सांगितली
Haribhau Bagade Share Memories of Late Gopinath Munde
Haribhau Bagade Share Memories of Late Gopinath Munde

औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे आणि माझा संपर्क अगदी सुरुवातीपासून होता. 1985 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यानचा एक प्रसंग मला अजूनही आठवतो .जालना लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी माझ्यावर होती .मी लोकसभा प्रमुखच असल्यामुळे या मतदारसंघातल्या प्रचार सभांचे नियोजन, नेत्यांची राहण्याची व्यवस्था , पदाधिकाऱ्यांच्या बैठका याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती.

गेवराईचा भाग त्यावेळी जालना लोकसभा मतदारसंघात येत होता. त्यामुळे गेवराईत राक्षसभुवनला एक सभा ठेवण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे तेव्हा आमदार होते. सभेच्या काही तास आधी गोपीनाथ मुंडे राक्षसभुवनला आले. पण तिथे फारशी व्यवस्था मी स्वतः आणि काही पदाधिकारी नवीन असल्यामुळे आम्हाला करता आली नाही.

त्यामुळे मुंडे नाराज झाले, ''ते मला म्हणाले हरिभाऊ इथे तर काहीच व्यवस्था नाही आता काय करायचे?'' तेव्हा मी त्यांना म्हणालो, "साहेब मी आणि माझी कार्यकर्ते या भागात नवीन आहेत,  फारशी आम्हाला इथली माहिती नाही. त्यामुळे आता आहे तसं धकवून घ्या."

त्यावर मुंडे साहेब संतापले....हरिभाऊ आता काय करायचं? तुमचं कसं होणार? असं ते मला म्हणाले. त्यांचा चढलेला पारा पाहून मला काहीशी जाणीव झाली आणि मी ही त्यांना बोलून दाखवलं. मी म्हणालो, ''साहेब काय होईल फार तर तुम्ही मला आमदारकीचे तिकीट देणार नाही,'' यावर  आधी रागावलेले मुंडे अचानक हसायला लागले. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत ''हरिभाऊ होत असतं'', असं म्हणत गंभीर झालेले वातावरण आपल्या स्वभावातून सामान्य केले.

योगायोगाने सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली. मुंडे आणि माझे संबंध हे मित्राप्रमाणे होते आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करायचो. आज त्यांची जयंती असल्याने अनेक प्रसंग डोळ्यासामोर उभे राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com