BJP Leader Girish Mahajan Reaction on Ramjanma bhoomi Verdict | Sarkarnama

महाराष्ट्रात लवकरच रामराज्य येईल : गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्येत खटल्याच्या निकालावर समाधान व आनंद व्यक्त करीत लवकरच महाराष्ट्रात देखील रामराज्य येईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

नाशिक  : अयोध्येत खटल्याच्या निकालावर समाधान व आनंद व्यक्त करीत लवकरच महाराष्ट्रात देखील रामराज्य येईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्येतील वादग्रस्त जमीन आणि रामजन्मभूमी याविषयीच्या खटल्याचा निकालाचे वाचन केले. याविषयी शहरातील विविध आकड्यांचे महंत तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी आनंद व्यक्त केला. लाडू वाटले. भाजपच्या कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काळाराम मंदिरात घंटानाद केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या निकालावर आनंद व्यक्त केला. 

ते म्हणाले की, महाराष्ट्रात देखील लवकरच रामराज्य येणार. थोडी वाट पाहा. युती व त्यातील घडामोडी याविषयी त्यांनी मतप्रदर्शन करणे टाळले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी चांगला आहे. न्यायालयाने निकालात संतुलन राखलं आहे. सर्वांनी शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख