मै हुं ना....नाशिकचा महापौर भाजपचाच होईल....म्हणतात गिरीश महाजन

नाशिकच्या महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना गोव्यात नेले आहे. आठ नगरसेवकांचा संपर्क होत नसल्याने भाजप चिंतेत आहे
BJP Leader Girish Mahajan Confident About BJP Mayor in Nashik
BJP Leader Girish Mahajan Confident About BJP Mayor in Nashik

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महापालिकेतील नगरसेवकांतील फाटाफुटीने इच्छुक व नेते चिंतीत आहेत. गोव्याच्या रिसोर्टमध्ये सहलीला असलेल्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागाल आहे. या सगळ्यांना आश्‍वस्त करीत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक नगरसेवकाशी चर्चा केली. ते म्हणाले, "चिंता नसावी. यंदाही नाशिकचा महापौर भाजपचाच होईल. मै हु ना!''

सगळ्यांना आश्‍वस्त करीत ते म्हणाले, ''राज्यात भाजपची सत्ता असलेल्या इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये परिस्थिती बिकट आहे. परंतु, ही परिस्थिती का निर्माण झाली याची कारणेही तुम्हाला माहीत आहे. परंतु चिंता करू नका, सत्ता आपलीच येणार आहे.''

गोवा येथे भाजप नगरसेवकांच्या कॅम्पमध्ये दोन दिवसांपासून गिरीश महाजन आहेत. राज्यातील इतर महापालिकांमध्ये भाजपच्या सत्तेची सर्व गणिते जमली आहेत. नाशिकमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे लक्ष नाशिककडे लागल्याची कबुली त्यांनी दिली. कोकण सहल आटोपून नगरसेवक व त्यांचे कुटुंबीय सोमवारपासून गोव्यात गेले आहेत. मंगळवारी दिवसभरात आणखी दोन नगरसेवक दाखल झाल्याने संख्या पन्नासपर्यंत पोचली.

भाजपच्या 65 नगरसेवकांपैकी अद्यापही आठ नगरसेवक संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. खरोखर या नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यास नियोजित महाशिवआघाडीचे पारडे जड होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मनसेच्या भूमिकेवर सर्व अवलंबून असल्याने मनसे किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहे. बागा बिचसमोरील नाजीर रिसोर्टमध्ये सायंकाळी श्री. महाजन यांनी नगरसेवकांना संबोधित केले. 

बहुमत असूनही नाशिकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. माजी आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी त्यांच्याबरोबर जाणे पसंत केल्याची कबुली त्यांनी दिली. परंतु महापालिकेत सत्ता भाजपचीच येणार असल्याने चिंता करू नका, असा सल्ला देताना महापौर लादला जाणार नसल्याचा शब्द दिला. सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेऊनच महापौरपदासाठी निवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नीतेश राणे, आमदार सीमा हिरे या बैठकीला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com