पहिल्या यादीत नांव नसूनही एकनाथ खडसेंनी भरला अर्ज

भारतीय जनता पक्षातर्फे पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याच्या सर्व मतदार संघातील नावे जाहिर करण्यात आली आहे. त्यात मुक्ताईनगर मतदार संघाचे नाव मात्र वगळण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान खडसे यांनी आज मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याच्या सर्व मतदार संघातील नावे जाहिर करण्यात आली आहे. त्यात मुक्ताईनगर मतदार संघाचे नाव मात्र वगळण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान खडसे यांनी आज मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यातील 125 मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात पक्षाकडे असलेल्या सात जागा पैकी सहा जागांचे उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत. त्यात फक्त मुक्ताईनगर मतदार संघातील उमेदवार जाहिर करण्यात आले नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.एकनाथराव खडसे यांनी मात्र आज मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com