BJP Leader Brings One Crores Fund to Solve Water issue | Sarkarnama

पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी नामपूरच्या भाजप नेत्याने आणला अमेरिकेतून कोटींचा निधी 

प्रशांत बैरागी 
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नामपूरला अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील मोसम नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधल्यास हा प्रश्‍न सुटणार होता. त्यामुळे त्यासाठी पंचायत समिती, जिल्हाधिकारी आदींकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र योग्य प्रतिसाद मिलत नव्हता. त्याला कंटाळलेल्या डॉ. गिरासे यांनी त्यातुन मार्ग काढण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचे ठरवले.

नामपूर : दहा- वीस लाखांचा निधी मिळाल्यावरही त्याचा मोठा गाजावाजा होतो. गावाच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी रेंगाळलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते डॉ. दिकपाल हिरासे यांनी तालुका किंवा जिल्हाधिकारी नव्हे तर चक्क अमेरिकेतुन एक कोटींचा निधी मिळवला आहे. मायलन कंपनीच्या 'सीएसआर' फंडातुन मिळालेल्या निधीमुळे परिसराचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

नामपूरला अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील मोसम नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधल्यास हा प्रश्‍न सुटणार होता. त्यामुळे त्यासाठी पंचायत समिती, जिल्हाधिकारी आदींकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र योग्य प्रतिसाद मिलत नव्हता. त्याला कंटाळलेल्या डॉ. गिरासे यांनी त्यातुन मार्ग काढण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचे ठरवले. अमेरीकेतील मायलन कंपनीकडे 'सीएसआर' फंडासाठी त्यांनी पाठपुरावा सुरु केला. त्यांच्या प्रयत्नात अनेक अडथळे आले. 

हे गाव परिसराची बाजारपेठ आहे. मोसम नदीवर सार्वजानीक पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरासाठी कोल्हापुर बंधाऱ्याची जूनी मागणी होती. मात्र मोसम नदी अधिसूचित असल्याने बांध घालण्यास अडचणी होत्या. डॉ गिरासे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सचिवांकडे पत्रव्यवहार सुरु केला. त्यातुन जलसंपदा विभागाने दोन वर्षांपूर्वी त्याला मंजूरी दिली. मात्र, निधी नव्हता. यंदा ऑक्‍टोबरमध्ये पाणीटंचाईचा वणवा पेटला. रोज दहा टॅंकर्सची मागणी होती. त्यातून प्रतीव्यक्ती सत्तर हजारांचा बोजा होता. हे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यावर प्रशासकीय अडचणी दुर झाल्या. 

आपल्या परिचयातुन त्यांनी अमेरिकेतील मायलन कंपनीचे भारतीय वंशाचे अध्यक्ष राजीव मलिक यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यात जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, जलसंधारण विभागाचे सागर शिंदे, नाशिक प्रतिनिधी पी.के.सिंग यांचे सहकार्य मिळाले. त्यातून हा एक कोटींचा निधी प्राप्त झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. 
 

गेल्या दोन वर्षापासून नामपूरला हा प्रकल्प व्हावा यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करीत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले. त्यातुनच मायलन कंपनीचा एक कोटींचा निधी प्राप्त झाला. - डॉ दिकपाल गिरासे, भाजप. 
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख