खडसेंची भविष्यवाणी अन्‌ अजित पवारांचा राजीनामा!

विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेल्या महिनाभर राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटत नसताना राज्याच्या राजकारणातून काहीसे बाजूला झालेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी सोमवारी शहरातील एका सायंदैनिकाच्या वर्धापनदिन सोहळ्यात हजेरी लावत प्रसारमाध्यमे व सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. त्यात त्यांनी अजित पवार राजीनामा देतील, अशी भविष्यवाणी वर्तवली होती
BJP Leader Eknath Khadase Predicted About Ajit Pawar Resignation
BJP Leader Eknath Khadase Predicted About Ajit Pawar Resignation

जळगाव  : भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी सोमवारी जळगावातील स्थानिक कार्यक्रमात प्रसारमाध्यमांबाबत बोलताना "उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार राजीनामा देतील.. सूत्रांकडून कळते..'' असे केलेले वक्तव्य काल तंतोतंत खरे ठरले. खडसेंचे हेच वक्तव्य भविष्यवाणी होती की, राजकीय अंदाज याबद्दल जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेल्या महिनाभर राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटत नसताना राज्याच्या राजकारणातून काहीसे बाजूला झालेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी सोमवारी शहरातील एका सायंदैनिकाच्या वर्धापनदिन सोहळ्यात हजेरी लावत प्रसारमाध्यमे व सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला जनादेश दिलेला असताना केवळ मुख्यमंत्रिपदाच्या कारणावरून युतीत दरी निर्माण होऊन राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येण्याची स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय, सिंचन गैरव्यवहारातील 9 प्रकरणांच्या फाइल बंद करण्याचा निर्णयही सोमवारीच आल्यामुळे त्यावर 'योगायोग' यासंबंधी भाष्य करतानाही खडसेंनी अजित पवारांना क्‍लीनचीटचा हा योगायोग आहे, असा उपरोधिक टोलाही लगावला होता.

राजीनाम्याची भविष्यवाणी
प्रसारमाध्यमांच्या 'सूत्र' या विषयावरही खडसेंनी टीका केली. ही 'सूत्रं' येतात कुठून? असा प्रश्‍न उपस्थित करत "उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार राजीनामा देतील... सूत्रांची माहिती'' असे वक्तव्यही खडसेंनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ काल जिल्ह्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. राजकीय वर्तुळातही त्यासंबंधी दिवसभर चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com