bjp leader | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युती तुटली !

तणाव संपवण्यासाठी येत्या दोन दिवसात भाजप नेते मातोश्रीवर?

महेश पांचाळ : सरकारनामा न्यूज ब्युरो
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई : सेना आणि भाजपमधील ताणल्या गेलेल्या संबंधावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे येत्या दोन दिवसात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

मुंबई : सेना आणि भाजपमधील ताणल्या गेलेल्या संबंधावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे येत्या दोन दिवसात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावर विरोधी पक्षांच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात आणि आता जनतेच्या दरबारात 29 मार्चपासून संघर्ष यात्रा काढून कोंडीत पकडणार आहे. शिवसेनेनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी भूमिका सुरवातीला घेतली होती. परंतु, अर्थसंकल्प मांडताना सत्तेतील शिवसेनेची विरोधकांना साथ मिळू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्री आणि नेत्यांची समजूत घालण्यास यश मिळविले होते.

ग्रामीण भागातील शिवसेनेच्या आमदारांमध्ये सेनेच्या भूमिकेवरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे, अर्थसंकल्प अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असा आग्रह आता सेनेच्या आमदारांनी धरला आहे. त्यातून सेना आणि भाजपमधील संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. सेनेच्या धरसोड भूमिकेमुळेही भाजपच्या गोटात सेनेबाबत अद्याप विश्‍वासाचे वातावरण नसल्याने त्याचा फायदा विरोधक घेत असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सेना आणि भाजपामधील मागील निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर ताणले गेलेले संबंध सुधारावेत यासाठी भाजपकडून पुन्हा पुढाकार घेतला जात आहे.

सेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मातोश्रीवर भेटीचा निरोप देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे येत्या दोन दिवसात मातोश्रीवर जाणार असल्याचे समजते. हिंदू वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होत असल्याने 28 मार्चपूर्वी सेना आणि भाजपमधील संबंध पुन्हा चांगले व्हावेत, तसेच योग्य तोडगा काढण्याबाबत या बैठकीत चर्चा व्हावी, यासाठी आता भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख