पोटनिवडणूक संपेपर्यंत प्रसाद लाड रत्नागिरीत ठाण मांडणार

सत्तेसाठी हपापलेले पक्ष राज्यात एकत्र आले. मात्र, या पोटनिवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत, मग राज्यात काय सरकार चालवणार, असा सवाल भाजपचे कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी येथे व्यक्त केला
Bjp Mla Prasad Lad Camping in Ratnagiri for Bye Election
Bjp Mla Prasad Lad Camping in Ratnagiri for Bye Election

रत्नागिरी : नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन हे जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. पोटनिवडणूक संपेपर्यंत आम्ही येथे ठाण मांडून बसणार आहोत. आम्हाला विजयाची खात्री असून ही निवडणूक लादली गेली आहे. निवडणूक लादली नसती तर निवडणुकीचा खर्च विविध विकासकामांसाठी करता आला असता, असे मत भाजपचे कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी व्यक़्त केले.

सत्तेसाठी हपापलेले पक्ष राज्यात एकत्र आले. मात्र, या पोटनिवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत, मग राज्यात काय सरकार चालवणार, असा सवाल करून लाड म्हणाले की, आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्‌द्‌यावर लढवत आहोत. मच्छीमारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गेल्या एप्रिलमध्ये कोकणातील सर्व आमदारांची उद्‌धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. पण त्यातील प्रश्‍न जैसे थे आहेत, याचे उत्तर ठाकरे यांनी द्यावे.

भाजपने सत्तेत असताना अनेकांचे प्रश्‍न सोडवले. या प्रश्‍नांचे राजकारण केले नाही. त्यामुळे राज्यातील सरकारने दिशाभूल न करता विकासकामांवर लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी योजना जाहीर झाली आहे त्याकरिता ठाकरे सरकारने तरतूद केलेली नाही. शेतकऱ्यांना खोटे सांगून फक्त तोंडाला पाने पुसली आहेत. हे स्थगिती सरकार आहे, असेही लाड म्हणाले.

पाणी योजनेचा कंत्राटदार का सोडून गेला?

राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपाने सुपारी दिल्याचा आरोप आमदार उदय सामंत यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना लाड म्हणाले, ''माझ्या सांगण्यावरून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहिला तर माझे ऐकून राष्ट्रवादी तुमचा पाठिंबा काढून सरकारही पाडू शकते. रत्नागिरीची पाणी योजना कंत्राटदार का सोडून गेला? विकासकामे का ठप्प आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर सामंत यांनी द्यावे.''

 गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी 102 कोटी रुपये मंजूर केले. याला ठाकरे सरकारने स्थगिती आणली, याचा निषेध कोकणातील आमदार करणार का, असा सवालही लाड यांनी यावेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com