नाशिक : नगरसेवक फुटल्याने भाजपचे व्हाटस्‌ऍप, 'एसएमएस'द्वारे व्हीप

गेले सहा दिवसांपासून विविध ठिकाणी सहलीला गेलेले भाजपचे नगरसेवक आज सायंकाळी शहराजवळ परततील. उद्या (ता.22) महापौर, उपमहापौरपदाची निवडणुक आहे. मात्र आठ नगरसेवक भाजपने विविध प्रकारे प्रयत्न करुनही त्यांच्या कॅम्पमध्ये गेलेले नाहीत.
BJP To Issue Whips to Corporators for Nashik Mayor Election
BJP To Issue Whips to Corporators for Nashik Mayor Election

नाशिक : महापौर, उपमहापौरांची निवडणूक उद्या (ता.22) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपमधील आठ ते दहा नगरसेवक फुटले आहेत. त्यांच्यावर दबावासाठी पक्ष 'व्हीप' बजावणार आहेत. मात्र, विरोधकांनी त्यातही पळवाटा शोधल्या आहेत. या वाटा बुजविण्यासाठी पक्षाकडून यंदा लिखीत व्हीपसह 'व्हाटस्‌ऍप' आणि 'एसएमएस'चाही वापर करणार आहे. पाच प्रकारे व्हीप बजावण्याचा विचार सध्या सुरु आहे. त्यामुळे एरव्ही आक्रमकपणे विरोधकांत फुट पाडणारा भाजप स्वतःच फुट टाळण्यासाठी धावपळ करतो आहे.

गेले सहा दिवसांपासून विविध ठिकाणी सहलीला गेलेले भाजपचे नगरसेवक आज सायंकाळी शहराजवळ परततील. उद्या (ता.22) महापौर, उपमहापौरपदाची निवडणुक आहे. मात्र आठ नगरसेवक भाजपने विविध प्रकारे प्रयत्न करुनही त्यांच्या कॅम्पमध्ये गेलेले नाहीत. कमलेश बोडके (माहौर), सुनिता पिंगळे (उपमहापौर) यांनी परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आमच्यासोबत चौदा सदस्य असल्याचा दावा या बंडखोरांनी केला आहे. त्यामुळे 'मनसे' तटस्थ राहिल्यास भाजपची संख्या काठावर जाते. त्याने त्यांची चांगलीच धाकधुक आहे. त्यामुळे संघटनमंत्री किशोर काळकर भाजपच्या नगरसेवकांचे 'ब्रेन वॉश' करण्यासाठी संबोधीत करतील. सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.

या संदर्भात या निवडणुकीत भाजप नगरसेवकांकडून होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महापालिकेतील भाजपकडून व्हीप बजावला जाणार आहे. व्हीप बजावताना थेट हातात पक्षादेशाचा कागद देण्याची पद्धत आहे, पण 'आम्हाला व्हीप मिळालाच नाही' ही वळवाट घेऊन कायदेशीर मार्गाने सुटण्याची शक्‍यता असल्याने पाच व्हीप बजावले जाणार आहेत. पहिला व्हीप पत्राच्या माध्यमातून, त्यानंतर व्हॉट्‌सऍप, भ्रमणध्वनी संदेश, रजिस्टर पोस्टाद्वारे व वर्तमानपत्रात जाहिरात देऊन दिला जाणार आहे.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेला मदत करण्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. महापौर, उपमहापौरपदाचे अर्ज दाखल करताना शिवसेना नेत्यांची मदत घेण्यात आली. त्यावरून भाजपमध्ये फूट अटळ मानली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या सर्व 65 नगरसेवकांना व्हीप बजावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com