आमचं ठरलय आता....इस्लामपूरात  निशिकांतदादा आमदार!  

भारतीय जनता पक्ष कोणा काका-पुतण्याचा नसून सर्वसामान्यांचा पक्ष आहे. आपला पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. येथे कर्तबगार नेतृत्वाला संधी दिली जाते. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार परिवर्तन करेल आणि तुमच्या मनातला आमदार निवडून येईल असे मत लोकलेखा समितीचे राज्य अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनी व्यक्‍त केले.
आमचं ठरलय आता....इस्लामपूरात  निशिकांतदादा आमदार!  

इस्लामपूर : भारतीय जनता पक्ष कोणा काका-पुतण्याचा नसून सर्वसामान्यांचा पक्ष आहे. आपला पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. येथे कर्तबगार नेतृत्वाला संधी दिली जाते. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार परिवर्तन करेल आणि तुमच्या मनातला आमदार निवडून येईल असे मत लोकलेखा समितीचे राज्य अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनी व्यक्‍त केले.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील बुथ अध्यक्ष, शक्‍तीकेंद्र प्रमुख, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची एकत्रित बैठक प्रकाश शैक्षणिक संकुलामध्ये झाली. प्रमुख पाहुणे म्हणून पटवर्धन बोलत होते. भाजपाचे राज्य सरचिटणीस मकरंद देशपांडे अध्यक्षस्थानी होते. सचिन पटवर्धन म्हणाले, "इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद निश्‍चित वाढली आहे. या मतदारसंघात राज्य व केंद्र शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यात कार्यकर्ते, पदाधिकारी यशस्वी झाले आहेत. निशिकांत पाटील यांच्यासारखे अभ्यासू, सुसंस्कृत, दुरदृष्टी असणारे नेतृत्व पक्षाला मिळाले आहे. हेच नेतृत्व येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत कमळ या चिन्हावर निवडणूक लढवून विरोधी नेतृत्वाचा निश्‍चित पराभव करेल. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आत्तापासून जोमाने कामाला लागावे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बदल क्रांतीकारक आहे. अभूतपूर्व विजय असून खऱ्या अर्थाने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथरचनेतील कार्यकर्ते हे राबल्यानेच हा विजय साध्य करता आला.''

मकरंद देशपांडे म्हणाले, ''या मतदासंघात पक्षाला अपेक्षित असे कार्यकर्ते, नेतृत्व मिळाले आहे. निशिकांतदादांच्या माध्यमातून जीवाचे रान करणारे कार्यकर्ते मिळाले आहेत. या मतदारसंघात भाजप पक्ष आत्ताच विजयापर्यंत पोहचला आहे. उर्वरीत दिवसासाठी आत्तापासूनच चिकाटीने, निष्ठेने कामाला लागा. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव भाजप पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातही परिवर्तन निश्‍चित होईल.'' 

नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, "इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या विचाराचे 50 हजाराहून अधिक मतदार आहेत. यापूर्वी स्वर्गीय अशोकदादा पाटील यांनी भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. आज भाजप पक्ष हा विरोधी पक्षाच्या तोडीस तोड ताकदीचा तयार झाला आहे. पक्षाने वाळवा तालुक्‍याला विकास कामासाठी दिलेला निधी,  प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेलं पाठबळ ही पक्षाची जमेची बाजू आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी माझी ताकद आणि ओळख आहे.'' 

सांगली जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस सुरेंद्र चौगुले, औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक वैभव शिंदे यांनी मनोगत व्यक्‍त केले. तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी स्वागत केले. विक्रम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.

आमचं ठरलय म्हणून कामाला लागा
मकरंद देशपांडे म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात परिवर्तन घडवायचं आहे. जसं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात " आमचं ठरलय ' असं होतं तसच आता तुम्ही सर्वांनी ठरवून टाकलय. म्हणून आत्तापासूनच 'आमचं ठरलय आत्ता दादा आमदार' असा मेसेज व्हॉटस्‌ऍप व फेसबुकवर पाठवा व कामाला लागा,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com