शिवसेनेच्या रिफायनरी समर्थकांना भाजपचे निमंत्रण ; सेनेकडून कारवाईला सुरवात

पक्ष विरोधी भूमिका घेत नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात शिवसेनेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाला भाजपने पाठिंबा दिला आहे
BJP Inviting Unhappy Shivsena Workers
BJP Inviting Unhappy Shivsena Workers

राजापूर : पक्ष विरोधी भूमिका घेत नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात शिवसेनेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाला भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये यावे. आम्ही त्यांचे निश्‍चितच स्वागत करू, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केले आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारचा विषय संपल्याचे जाहीर केले. मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या सागवे विभागातील पदाधिकाऱ्यांनी नाणारचे जाहीररित्या समर्थन करीत विकासासाठी प्रकल्प झालाच पाहिजे अशी भूमिका मांडली. नाणारचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प समर्थनाचे झेंडेही फडकावले होते. त्यामुळे संघटनेविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर सेना नेतृत्वाने कारवाईला सुरवात केली आहे.

सागवेचे विभागप्रमुख राजा काजवे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. काहींवर भविष्यात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. विकासासाठी नाणार रिफायनरी प्रकल्प तालुक्‍यात होणे गरजेचे आहे. प्रकल्प झाल्यास त्यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे भाजपने या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. भाजपप्रमाणे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची रिफायनरीबाबत समर्थन करणारी भूमिका असल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये यावे, असे जाहीर निमंत्रण गुरव यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com