bjp interview for sangamner assembly seat | Sarkarnama

'त्या' 26 जणांतून ठरणार थोरातांचा प्रतिस्पर्धी!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

नगर  : भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी जिल्ह्यातून 126 जणांनी हजेरी लावली. सर्वांत जास्त इच्छुक संगमनेर मतदारसंघातून होते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लढण्यासाठी 26 जण इच्छुक असल्याचे दिसून आले.

नगर  : भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी जिल्ह्यातून 126 जणांनी हजेरी लावली. सर्वांत जास्त इच्छुक संगमनेर मतदारसंघातून होते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लढण्यासाठी 26 जण इच्छुक असल्याचे दिसून आले.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबकटर यांनी आज तारकपूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार वैभव पिचड, बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, प्रसाद ढोकरीकर, श्‍यामराव पिंपळे आदी उपस्थित होते. 

विधानसभा मतदारसंघ इच्छुक उमेदवार : 
संगमनेर : हरिभाऊ चकोर, राजेश चौधरी, भानुदास डेरे, पूजा दीक्षित, विक्रमसिंह खताळ, सदाशिव थोरात यांच्यासह 26 जण. 
कोपरगाव : आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्यासह 9 जण. 
शिर्डी : मंत्री राधाकृष्ण विखे, नकुल कडू, ऋषिकेश खर्डे.
श्रीरामपूर : नितीन उदमले, अशोक वाकचौरे, अशोक कानडे, भाऊसाहेब वाकचौरे, चंद्रकांत काळोखे, नितीन दिनकर, मिलिंद साळवे यांच्यासह 21 जण. 
नेवासे : आमदार बाळासाहेब मुरकुटे, सचिन देसार्डा, अशोक ताके, अनिल ताके, अभिजित लुणिया यांच्यासह 8 जण. 
शेवगाव-पाथर्डी : आमदार मोनिका राजळे, दिलीप लांडे, अर्जुन शिरसाठ, नितीन काकडे, अशोक चोरमले, हर्षदा काकडे, डॉ. अजित फुंदे यांच्यासह 14 जण. 
श्रीगोंदे : बबनराव पाचपुते, राजेंद्र म्हस्के, दिलीप भालसिंग, दत्तात्रेय हिरणवळे, सुवर्णा पाचपुते यांच्यासह 8 जण. 
राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले, सत्यजित कदम यांच्यासह 6 जण. 
पारनेर : बाळासाहेब पोटघन, अश्‍विनी थोरात, वसंत चेडे, निर्मला थोरात यांच्यासह 15 जण.
अकोले : वैभव पिचड, अशोक भांगरे, सुनीता भांगरे. 
कर्जत-जामखेड : राम शिंदे 
नगर शहर : जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुवेंद्र गांधी, अभय आगरकर, महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा आदींसह 12 जण. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख